Crime News : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षकाने आपल्याच एका 16 वर्षाच्या विद्यार्थिनीवर शिकवणीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पडितेला वाचवण्यासाठी कुटुंबियांनी घटनास्थळी पोहोचले, आरोपी शिक्षकाने तिला ढकलले आणि घटनास्थळावरून पळ काढल्याचे वृत्त आहे. पीडित मुलगी ही अल्पवयीन असून एका खासगी शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मालेगाव : प्रजासत्ताक दिनी फुग्यात गॅस भरताना सिलिंडरचा झाला स्फोट, दुर्घटनेत सात जण गंभीर जखमी
शिक्षकाने केला विश्वासघात
कुटुंबाच्या म्हणण्यांनुसार, आरोपी शिक्षक नियमितपणे शाळेनंतर विद्यार्थिनीच्या घरी शिकवण्यासाठी जात होता. काही गावातील मुले देखील शिकवणीसाठी येत होती. यामुळे पीडितेच्या कुटुंबाचा शिक्षकावर पूर्णपणे विश्वास निर्माण झाला होता. पण त्याच शिक्षकाने विश्वासघात केला. अशातच सायंकाळी जे काही घडलं ते सर्वांसाठी धक्कादायक आणि अस्वस्थ करणारं होतं.
शिक्षकाचे विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न
आरोपी आहे की, शिक्षकाने शिकवणीनंतर मुलांना नियोजित वेळेत घरी पाठवले, नंतर त्याने विद्यार्थिनीला खोलीत एकटेच सोडले. आरोपीने त्या विद्यार्थीसोबत अश्लील कृत्य केलं आणि नंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने धाडस दाखवत आरडाओरड केली, यानंतर घटनास्थळी पीडितेची बहीण धावत खोलीत गेली आणि तिच्या धाकट्या बहिणीला आरोपीच्या तावडीतून सोडवण्याचे काम केलं.
हे ही वाचा : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? साताऱ्यातील दुर्गम भागात DRI ची धाड, 55 कोटींचं ड्रग्ज अन् कच्चा माल जप्त
कुटुंबाला मोठा धक्का बसला
आरोपी शिक्षकाने पळ काढताना दोन्ही बहिणींना ढकलून दिले होते. या घटनेनं कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. या घटनेनं गाव हादरून गेले होते. या घटनेनंतर कुटुंबाने पीडितेला पोलीस ठाण्यात नेले. विद्यार्थिनीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT











