Crime news : प्रेयसीवर असलेल्या संशयातून प्रियकराने चाकूने गळा चिरुन प्रेयसीची हत्या केली आहे. प्रियकर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते एका पोत्यात भरले. हे पोते घेऊन प्रेयसीच्याच दुचाकीवरुन तो सगळ्या शहरात फिरला. पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रियकराला ताब्यात घेतले आहे. आग्रा येथे 23 जानेवारी रोजी ही घटना घडली.
ADVERTISEMENT
पोत्यात आढळला मृतदेह, मात्र डोके गायब
रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबीय काळजीत पडले. सर्वत्र शोधाशोध करुनही मुलगी न सापडल्याने आग्र्यातील ट्रान्स यमुना पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार कुटुंबियांनी नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या टीम तयार केल्या. शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि वसाहतींवर बसवलेल्या जवळपास 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान, 24 जानेवारी रोजी रात्री 1 वाजता ट्रान्स यमुना पोलिस स्टेशन परिसरातील पार्वती विहार परिसरात एक पोते आढळून आले. पोते उघडताच पोलिसांना धक्का बसला. आत एका तरुणीचा मृतदेह होता. पण यामध्ये तिचं डोकं नव्हतं. मृतदेहाची स्थिती अत्यंत भयानक होती.
'या' कारणामुळे केली हत्या
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव विनय असे आहे. पोलिस चौकशीत विनयने सांगितले की, तो आणि मृत तरुणी एकाच ऑफिसमध्ये काम करत होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते. त्याला संशय होता की तिचे दुसऱ्या पुरुषाशीही संबंध आहेत. या मुद्द्यावरुन दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाला. 23 जानेवारी रोजी विनयने तरुणीला ऑफिसमध्ये बोलावले. वादानंतर त्याने चाकूने तिचा गळा चिरला आणि नंतर तिचे डोके आणि पाय कापले आणि मृतदेह पोत्यात भरला. हत्येनंतर, आरोपीने मृतदेह तरुणीच्याच दुचाकीवर लादला आणि सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या यमुना पुलावर नेला. तिथे त्याने ते पोते पुलावरुन फेकून दिले आणि कापलेले डोके नाल्यात फेकून दिले.
हे ही वाचा : मधुचंद्राच्या रात्रीच बायकोच्या पोटात दुखू लागलं; सकाळी नवऱ्यानं गावभर वाटली मिठाई, नेमकं काय घडलं?
हुशारी करण्याचा प्रयत्न फसला
हत्या केल्यानंतर विनयने हुशारी करण्याचा प्रयत्न केला. तरुणी गायब झाल्याने तिला शोधण्याचे नाटक त्याने केले. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो तिच्या कुटुंबासह पोलिस स्टेशनमध्ये तिच्या हरवण्याची तक्रार दाखल करण्यासाठी आला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे डोके अजून सापडलेले नाही. आरोपीला अटक करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











