आईनेच तान्हुल्या बाळाला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं, भटक्या जनावरांनी लचके तोडले; डॉक्टरांकडे नेईपर्यंत जीव गेला

Crime News : स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. झुडपात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नवजात बाळाला पाहून नागरिक सुन्न झाले. तातडीने या घटनेची माहिती 108 रुग्णवाहिका सेवेला देण्यात आली. माहिती मिळताच मांडल येथील 108 रुग्णवाहिका सेवा तात्काळ सक्रिय झाली. रुग्णवाहिकेचे चालक प्रभू प्रजापत आणि पुरुष नर्स गिरिराज पायक यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. मात्र, शेवटी बाळाचा जीव गेला.

Crime News

Crime News

मुंबई तक

27 Jan 2026 (अपडेटेड: 27 Jan 2026, 09:46 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आईनेच तान्हुल्या बाळाला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं

point

भटक्या जनावरांनी लचके तोडले; डॉक्टरांकडे नेईपर्यंत जीव गेला

Crime News : राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. बनेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानोदिया गावाजवळ एका निर्दयी महिलेने आपल्या नवजात बाळाला रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात टाकून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आईच्या कुशीत सुरक्षित असायला हवा तो निष्पाप जीव झुडपात एकटाच पडून राहिला आणि दुर्दैवाने भटक्या जनावरांनी त्याच्यावर हल्ला केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे वाचलं का?

स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. झुडपात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नवजात बाळाला पाहून नागरिक सुन्न झाले. तातडीने या घटनेची माहिती 108 रुग्णवाहिका सेवेला देण्यात आली. माहिती मिळताच मांडल येथील 108 रुग्णवाहिका सेवा तात्काळ सक्रिय झाली. रुग्णवाहिकेचे चालक प्रभू प्रजापत आणि पुरुष नर्स गिरिराज पायक यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही? वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा सवाल, गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण VIDEO

झुडपात पडलेल्या नवजात शिशूला तात्काळ रुग्णवाहिकेतून बनेडा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, बाळाच्या शरीरावर भटक्या जनावरांनी लचके तोडल्याच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या. हे दृश्य इतके विदारक होते की रुग्णालयात उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

घटनेची माहिती मिळताच बनेडा पोलीस ठाण्याचे अधिकारीही तात्काळ रुग्णालयात आणि घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन मोर्चरीत ठेवला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे.

पोलिसांकडून सध्या परिसरातील गावांमध्ये चौकशी केली जात आहे. अलीकडेच प्रसूती झालेली महिला, संशयित हालचाली, तसेच परिसरातील आरोग्य केंद्रांचीही माहिती घेतली जात आहे. नवजात अर्भकाला अशा प्रकारे झुडपात टाकण्यामागचे नेमके कारण काय, ही महिला कोण होती आणि तिने एवढे अमानुष पाऊल का उचलले, याचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. समाजात अजूनही अशा अमानवी घटनांना आळा बसलेला नाही, याचे हे विदारक उदाहरण असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

प्रेमसंबंधात अडसर ठरतो म्हणून एका वर्षाच्या चिमुकल्याची अपहरण करून हत्या; विवाहित महिलेच्या प्रियकराचं कृत्य

    follow whatsapp