उपचाराच्या नावाखाली डॉक्टरांनी महिला पेशंटला भुलीचं इंजेक्शन दिलं, नंतर अश्लील रिल बनवून केलं ब्लॅकमेल

Crime News : एका डॉक्टरांनी तरुणीला उपचारादरम्यान भुलीचं इंजेक्शन दिलं. त्यानंतर पीडितेचे अश्लील फोटो देखील काढले आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यात आले. पीडितेचं म्हणणं आहे की, डॉक्टरने तिला जबरदस्ती भेटण्यास दबाव आणला होता, पण तिने भेटण्यास नकार दिला होता. डॉक्टरांनी पीडितेचा अश्लील रिल बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. 

crime news

crime news

मुंबई तक

• 07:48 PM • 26 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टरांनी उपचारादरम्यान पीडितेला भुलीचे इंजेक्शन देत अश्लील व्हिडिओ बनवले

point

डॉक्टर करन पटेल विरोधात गुन्हा दाखल

Crime News : उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यात एक गंभीर प्रकरण उघडकीस आलं. एका डॉक्टरांनी तरुणी पेशंटला उपचारादरम्यान भुलीचं इंजेक्शन दिलं. त्यानंतर पीडितेचे अश्लील फोटो देखील काढले आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यात आले. पीडितेचं म्हणणं आहे की, डॉक्टरने तिला जबरदस्ती भेटण्यास दबाव आणला होता, पण तिने भेटण्यास नकार दिला होता. डॉक्टरांनी पीडितेचा अश्लील रिल बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : किशोरवयीन मुलीला खोलीत नेत केले सामूहिक अत्याचार, डोळ्यावर इतकं मारलं की काहीही दिसेना

डॉक्टरांनी उपचारादरम्यान पीडितेला भुलीचे इंजेक्शन देत अश्लील व्हिडिओ बनवले

हे प्रकरण पिपरी पोलीस ठाणे परिसरातील एका गावातील असल्याचं बोललं जातंय. क्लिनिकमध्ये असलेल्या करन पटेल नावाच्या डॉक्टरांनी उपचारादरम्यान पीडितेला भुलीचे इंजेक्शन दिले. नंतर पीडित तरुणी बेशुद्ध पडली होती. हाच फायदा घेत डॉक्टरांनी पीडितेचे अश्लील फोटो कैद केले. 

पीडितेनं सांगितलं की,आरोपीने गावातील एका छोट्या मुलाला एक नशेचं औषध दिलं होतं, तेच औषध सर्वांना देण्यास सांगितलं होतं. जेव्हा सर्व लोक झोपतील तेव्हा तो मुलगा येईल, अशी माहिती पीडितेनं दिली होती. ही माहिती पीडितेला समजताच तिने आपल्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती दिली होती. जेव्हा पीडितेचा भाऊ मोक्यावर आला असता त्याने आरोपीला शिवीगाळ केली आणि नंतर धमकी देखील दिली, नंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.  

हे ही वाचा : नांदेड : महसूल सेविकेचा सुनेनेच केला खून, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने काटा काढला

डॉक्टर करन पटेल विरोधात गुन्हा दाखल 

पीडितेनं केलेल्या तक्रारीनुसार, पिपरी पोलिसांनी आरोपी डॉक्टर करन पटेल विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 77, 352 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच आरोपीला अटक केली जाईल. 

    follow whatsapp