Bengaluru cricket dispute : बंगळुरुतील एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेनंतर झालेल्या वादाचे रुपांतर भीषण दुर्घटनेत झाले आहे. यामध्ये हेब्बगोडी येथील प्रशांतला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी त्याचा 28 वर्षीय मित्र रोशन हेगडे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिकेट स्पर्धेनंतर हे दोघे मद्यपानासाठी बसले होते. यावेळी वाद पुन्हा उफाळून आला. हा वाद वाढल्यानंतर रोशन आपल्या कारमधून जाऊ लागला. तेव्हा प्रशांत त्याला अडवण्यासाठी त्याच्या कारच्या खिडकीला लटकला. मात्र रोशनने बेदरकारपणे कार एका झाडावर घातली. यात प्रशांतचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : उपचाराच्या नावाखाली डॉक्टरांनी महिला पेशंटला भुलीचं इंजेक्शन दिलं, नंतर अश्लील रिल बनवून केलं ब्लॅकमेल
नेमकं काय घडलं?
ही घटना रविवारी रात्री घडली. मृत तरुणाची ओळख हेब्बगोडी येथील रहिवासी प्रशांत अशी झाली आहे. त्याचा मित्र रोशन हेगडे (वय 27) हा कार चालवत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांची क्रिकेट टीम स्थानिक स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली. हा वाद मैदानापुरता मर्यादित न राहता सायंकाळी मद्यपान करत असताना पुन्हा उफाळून आला. वाद वाढल्यावर रोशनने आपल्या कारमधून निघून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रशांतने रोशनला थांबवण्यासाठी चालत्या कारच्या डाव्या बाजूच्या खिडकीला धरून ठेवले. मात्र रोशनने गाडी पुढे चालवली आणि कार थेट झाडावर आदळली.
प्रशांतच्या आईने दाखल केली तक्रार
प्रशांतच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, रोशनला रोखण्यासाठी प्रशांतने त्याच्या चालत्या कारच्या डाव्या बाजूच्या खिडकीला पकडून लटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोशनने कार थांबवण्याऐवजी ती बेदरकारपणे तशीच पुढे नेली, ज्यामुळे नियंत्रण सुटून कार एका झाडाला जोरात धडकली.
हे ही वाचा : सांगली : फक्त मावा द्या म्हणाला अन् घडलं कांड; 30 रुपयांचा मावा जीवावर बेतला, सांगलीत नेमकं काय घडलं?
खुनाचा गुन्हा दाखल
या धडकेत प्रशांत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात रोशन हेगडेलाही गंभीर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT











