Crime News : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वादानंतर एका तरुणाच्या गुद्दद्वारात प्रशरमशीनने हवा भरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत तरुण गंभीरपणे जखमी झाल्याचे वृत्त आहे. तरुणाची प्रकृती बिघडली असून हैवानी कृत्य करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कुडवार पोलीस ठाणे परिसरात घडल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चिमुकली अंगणात खेळत असलेली पाहून नराधमातील राक्षस जागा, विकृतीची परिसिमा गाठत...
तरुणांनी मुलाच्या गुद्दद्वारात प्रेशर मशीनने हवा मारली
गावातील रहिवासी असलेल्या पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा एका पंक्चरच्या दुकानात असताना त्याचे सत्य प्रकाश उर्फ गांधी आणि गुलाम आरिफ आणि रिजवान यांच्याशी वाद निर्माण झाला होता. वाद वाढत गेल्यानंतर त्यांनी मिळून पीडित मुलाच्या गुद्दद्वारात प्रेशर मशीनने हवा मारली.
आरोपींकडून तरुणाला शिवीगाळ करत धमकी दिली
या घटनेनंतर तरुणाने आपल्या कुटुंबाला फोन करून कुटुंबियांना बोलावले, तेव्हा घटनास्थळी असलेल्या आरोपींनी त्याला शिवीगाळ केली होती. जर कोणाला काही सांगितल्यास जीवे मारहण्याची धमकी देखील दिली होती. पीडित तरुणाची प्रकृती बिघडली. एका व्यक्तीने पीडित तरुणाच्या घरी घडलेला सर्व प्रकार सांगितला. नंतर त्याला प्राथमिक उपचार केंद्रात नेले, नंतर डॉक्टरांनी पीडित तरुणाला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यास सांगितले.
हे ही वाचा : शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ, मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय
जिल्हा रुग्णालयात पीडित तरुणाची गंभीर परिस्थिती बघून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











