अनिल परबांच्या आरोपांनंतर रामदास कदम यांच्या पत्नी समोर, 1993 साली काय घडलं? सगळंच सांगितलं

मुंबई तक

Ramdas Kadam wife on Anil Parab allegations : अनिल परबांच्या आरोपांनंतर रामदास कदम यांच्या पत्नी समोर, 1993 साली काय घडलं? सगळंच सांगितलं

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनिल परबांच्या आरोपांनंतर रामदास कदम यांच्या पत्नी समोर

point

1993 साली काय घडलं? रामदास कदम यांच्या पत्नीने सगळंच सांगितलं

Ramdas Kadam wife on Anil Parab allegations : "रामदास कदम यांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतलं की कोणी तिला जाळलं? याची चौकशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी करावी. रामदास कदमांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यांचा मुलगा आता गृहराज्यमंत्री आहे. गृहखात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत. स्वत:च्या बापाने 1993 मध्ये कोणते उद्योग केले? याची चौकशी त्यांनी करावी.", असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. दरम्यान, अनिल परब यांच्या आरोपानंतर रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. 1993 मध्ये काय घडलं? याबाबत ज्योती कदम यांनी भाष्य केलंय. 

हेही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर, दोन्ही भावांमध्ये नेमकी चर्चा काय?

जसलोकला मी दोन महिने अॅडमिट होते

ज्योती कदम म्हणाल्या, रामदास कदम आणि आमच्या कुटुंबावर करण्यात आलेले आरोप फार चुकीचे आहेत. 1993 साली माझा अपघात स्टोव्हमुळे झाला होता. त्याकाळी आम्ही एवढे श्रीमंत नव्हतो. आम्ही करवंट्या जाळून सुद्धा जेवण केलं आहे. मीडियामध्ये येत आहे की, आमदारच्या घरी स्टोव्ह कसा असू शकतो? स्टोव्ह होते आणि गॅस पण होता. त्यावेळी बायका स्टोव्हवर देखील स्वयंपाक करत होत्या. मी उभी असताना माझा पदर स्टोव्ह वरती पडला. त्यानंतर स्टोव्हचा स्फोट झाला. त्यानंतर मी भाजले होते. त्यानंतर आम्ही खेडवरुन जसलोक रुग्णालयात आलो. कांदवलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो होतो. तेथून सांगण्यात आलं की, जसलोकमध्ये घेऊन जा.. जसलोकला मी दोन महिने अॅडमिट होते. माझ्या बाजूच्या रुममध्ये साहेब होते. त्यांनी असं करावं हे शक्यच नाही. ते असं का करतील? त्यांना करायचं असतं तर वाचवायचा प्रयत्न केला नसता. त्यांचा हात पण भाजलेला आहे. 

कुटुंबाला पण याचा त्रास होत आहे, आमची बदनामी करु नका

पुढे बोलताना ज्योती कदम म्हणाल्या, असं राजकारण फार चुकीच आहे. आज मी पहिल्यांदा मीडियासमोर आले आहे. मला सांगावं वाटलं म्हणून पुढे येऊन सगळं सांगत आहे. मीडियामध्ये एवढं पसरवू नका. कुटुंबाला पण याचा त्रास होत आहे. आमची एवढी बदनामी तर करु नका ना.. खरी परिस्थिती आहे का? तशी ते तुम्ही पाहा. आम्ही पण फेसबुक पाहातो, आम्हाला खूप त्रास होतो याचा.. जे आरोप होत आहेत, तसं काहीच झालेलं नाही. आमच्या लग्नाला 47 वर्ष झाली आहेत. राजकारणासाठी तुम्ही कुटुंबाचा उपयोग करायला नाही पाहिजे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp