मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर, दोन्ही भावांमध्ये नेमकी चर्चा काय?
Raj Thackeray uiddhav Thackeray : संजय राऊतांच्या नातीच्या बारशानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेले आहेत, त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याकडे राज्याचे लक्ष वेधलं गेलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संजय राऊतांच्या नातीच्या बारशानंतर राज ठाकरे मातोश्रीवर

दोन्ही भावांमध्ये नेमकी काय चर्चा?
Raj Thackeray uiddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नातीचं आज 5 ऑक्टोबर रोजी बारसं होतं. या बारशानिमित्त ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी बारशाला आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. बारशानंतर राज ठाकरे आता मातोश्रीवर गेल्यानं दोन्ही भावांमध्ये नेमकी चर्चा काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष वेधलं गेलं आहे.
हे ही वाचा : पुणे हादरलं! वाघोलीत खूनाचा थरार, तरुणाचं डोकं दगडानं ठेचून केलं ठार, पहाटे नेमकं काय घडलं?
राज ठाकरे मातोश्रीवर
संजय राऊतांच्या नातीच्या बारशाला ठाकरे बंधु आणि वरळीचे आमदार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंसह सुभाष देसाईंसह, मिलिंद नार्वेकरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर आता राज ठाकरे हे मातोश्रीवर गेल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वी मराठी भाषासक्तीविरोधात ठाकरे बंधु हे पहिल्यांदा एकत्रित आले होते. त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर गेले होते. तसेच गणेशोत्सवाला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दर्शनाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आता संजय राऊतांच्या नातीच्या बारशाच्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र आल्यानंतर राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर गेले आहेत.
हे ही वाचा : 6 ऑक्टोबरपासून विष योग निर्माण होणार, याचा काही राशीतील लोकांना धोका मिळणार, काय सांगतं राशीभविष्य?
नेमकी काय चर्चा?
दरम्यान, नुकताच ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आम्ही एकत्र आलोय हे एकत्र राहण्यासाठीच आल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या दसरा मेळाव्यानंतर आता राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले आहेत. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.