Crime News : एका शिक्षकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षक वर्गात एका महिलेसोबत रोमान्स करत होता. तेव्हा काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाला आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिलं आणि व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने व्हिडिओचा तपास करण्याबाबत सांगितलं आहे. ही घटना मध्य प्रदेशातील देवास येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी शिक्षकाचे नाव विक्रम कदम असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवी मुंबई : 'तुझी शिकण्याची लायकी आहे का?' विद्यार्थिनीचा मुख्यध्यापिकेनं वर्गात केला अपमान, नैराश्यात येऊन विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
व्हिडिओ बनावट
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओ बनावट असल्याचं शिक्षकानं सांगितलं आहे. हे प्रकरण ग्रामपंचायत बिसाली शासकीय प्राथमिक विद्यालया, झिरी परिसरातील आहे. ग्रामस्थांनी आरोप केला की, शिक्षक विक्रम कदम हे गेल्या काही वर्षांपासून तिथेच कार्यरत आहे. बऱ्याच वर्षांपासून शिक्षकाचे महिलेसोबत असंच वर्तन होते. अशातच समोर आलेला हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे.
संबंधित प्रकरणात गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, दोन दिवसांपासून उपसरपंचांनी हे प्रकरण सर्वांसमोर आणले, परंतु त्यांनी नकार दिला. यापूर्वी शाळेच्या संकुलातही तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने शिक्षकांचे मनधौर्य उंचावले होते.
हे ही वाचा : कोल्ड्रिफ सिरपच्या विषबाधेमुळे किडनीसह आता मेंदूला सूज, राज्यसरकारचा विक्रीबाबत मोठा निर्णय
..तर शिक्षकावर कारवाई केली जाईल
हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून बनवण्यात आल्यास शिक्षकावर कारवाई केली जाईल, असं प्राभारी जिल्हा शिक्षण अधिकारी हरि सिंह भारती म्हणाले. आरोपी शिक्षक विक्रम कदम यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यात त्यांनी मोबाईल फोनवर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार केला असल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT
