नवी मुंबई : 'तुझी शिकण्याची लायकी आहे का?' विद्यार्थिनीचा मुख्यध्यापिकेनं वर्गात केला अपमान, नैराश्यात येऊन विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

मुंबई तक

navi mumbai crime : नवी मुंबईत एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना तळवली गावात घडली आहे. एका मुख्यध्यापिकेने विद्यार्थिनीला अपमानित केल्यानं विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

ADVERTISEMENT

Navi Mumbai Crime
Navi Mumbai Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईत विद्यार्थिनीचा मुख्याध्यापिकेनं केला अवमान

point

नैराश्यात येऊन विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

point

धक्कादायक कारण आलं समोर

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना तळवली गावात घडली आहे. एका मुख्यध्यापिकेने विद्यार्थिनीला अपमानित केल्यानं विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनं नवी मुंबईतील तळवळी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. टोकाचं पाऊल उचलणारी मुलगी ही इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी तिची परीक्षा सुरु असताना तिच्याकडे कॉपी आढळल्याने 'तुझी शाळेत शिक्षण घेण्याची लायकी नाही', असं म्हणत लाजच काढली. यातून विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : कोल्ड्रिफ सिरपच्या विषबाधेमुळे किडनीसह आता मेंदूला सूज, राज्यसरकारचा विक्रीबाबत मोठा निर्णय

बेंचखाली आढळली कॉपी

जीवन संपवलेल्या विद्यार्थिनीचं नाव अनुष्का केवळे (वय 16) असे आहे. ती ऐरोलीतील सुशीलादेवी देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती. शुक्रवारी इयत्ता दहावीची शालेय अंतर्गत परीक्षा सुरु असताना तिच्याकडे कॉपी आढळली. ही कॉपी अज्ञाताने तिच्या बेंचकडे टाकली होती. तेव्हा ती कॉपी तिच्याकडे आढळल्याने परिक्षकांनी मुख्याध्यापिकांना कळवले होते. तेव्हाच मुख्याध्यापिकांनी तिला सर्वांसमोर अपमानित केले. 

रबाळे पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल

संबंधित प्रकरणाचा मुख्यध्यापिकेविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी अनुष्काला सर्वांसमोरच अपमानित केले. संबंधित प्रकरणात काही साक्षीदारही पोलिसांना मिळाले आहेत. अनुष्का घरी प्रचंड मानसिक तणावाखाली होती असे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : सोलापूर : नदीत बुडत असलेल्या मुलाला जीवाची बाजी लावून वाचवलं, पण बापाने जीव गमावला

नैराश्यात येऊन संपवलं जीवन

तिने नैराश्यातून शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. शाळेत सर्वांसमोर झालेला अपमान तिला असह्य झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांनी आरोप केला आहे. संबंधित प्रकरणात शाळेच्या मुख्यध्यापिकेविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp