सोलापूर : नदीत बुडत असलेल्या मुलाला जीवाची बाजी लावून वाचवलं, पण बापाने जीव गमावला

मुंबई तक

Solapur News : नदीत बुडत असलेल्या मुलाला जीवाची बाजी लावून वाचवलं, पण बापाने जीव गमावला; बार्शीतील घटना

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हृदयद्रावक, नदीत वाहून जाणाऱ्या मुलाला वाचवलं, मात्र वडिलांचा मृत्यू

point

बंधाऱ्यावरून पाय घसरून पडलेल्या मुलाला वाचविताना वडिलांचा मृत्यू

Solapur News : नदीच्या बंधाऱ्यावरील पाण्यात मुलगा बुडत असल्याचे पाहाताच वडिलांनी त्याला जीवाची बाज लावून वाचवले, पण दुर्दैवाने या घटनेत पित्याला मृत्यू झाला आहे. ही हृदयदावक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत तालुक्यातल्या वैराग धामणगाव रोडवरील नागझरी नदीच्या बंधाऱ्यावर रविवारी घडली. अरुण ऊर्फ डेविड बनसोडे (वय 40,मूळ रा.आसरा, होटगी रोड, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या पित्याचे नाव असून, मुलगा अनुग्रह बनसोडे (वय 11) याच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनुग्रह याची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

बंधाऱ्यावरून जाताना नदीचा पूर पाहण्यासाठी अन् मुलाचा पाय घसरला

अरुण बनसोडे हे सध्या धामणगाव (ता बार्शी जि सोलापूर) येथील राहिवासी आहेत. रविवारी दुपारी अरुण बनसोडे हे पत्नी, मुलासह वैरागवरून धामणगावकडे जात होते. जाताना नागझरी नदीच्या बंधाऱ्यावर थांबले. त्यांचा मुलगा अनुग्रह बनसोडे याचा अचानक पाय घसरला आणि तो नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात पडला. मुलाला बुडताना पाहून क्षणाचाही विलंब न लावता अरुण बनसोडे यांनी तात्काळ पाण्यात उडी घेतली. धाडसाने अनुग्रह याला पाण्याबाहेर काढले.

हेही वाचा : पुणे हादरलं! पोलिसावरच धारदार शस्त्राने वार, ड्युटी संपवून घरी जाताना दुचाकीस्वारांनी प्लॅन करुन गाठलं, नेमकं प्रकरण काय?

मुलाला वाचवले मात्र पित्याला जलसमाधी

अरुण बनसोडे यांनी नदीच्या वेगात वाहणाऱ्या पडलेल्या मुलाला वाचवले. मात्र स्वतः पाण्याच्या भोवऱ्यात अडकले. त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते पाण्यात बुडू लागले होते. हा थरार पाहून धामणगाव येथील प्रथमेश देशमुख, विठ्ठल खडके, संपत आलाट, नागेश जाधव यांनी, तसेच बंधाऱ्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना वाचण्यासाठी तात्काळ पाण्यात उतरले.

हे वाचलं का?

    follow whatsapp