पुणे हादरलं! पोलिसावरच धारदार शस्त्राने वार, ड्युटी संपवून घरी जाताना दुचाकीस्वारांनी प्लॅन करुन गाठलं, नेमकं प्रकरण काय?
Pune Crime : पुणे हादरलं! पोलिसावरच धारदार शस्त्राने वार, ड्युटी संपवून घरी जाताना दुचाकीस्वारांनी प्लॅन करुन गाठलं, नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे हादरलं! पोलिसावरच धारदार शस्त्राने वार

ड्युटी संपवून घरी जाताना दुचाकीस्वारांनी प्लॅन करुन गाठलं
Pune Crime : पुणे शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांसोबतच आता पोलीस कर्मचारीही असुरक्षित झाल्याचे चित्र समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल काटकर यांच्यावर रविवारी (दि.5) मध्यरात्री धारदार शस्त्राने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना लॉ कॉलेज रोड परिसरात घडली.
ड्युटी संपवून घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तरुणांकडून हल्ला
अधिकची माहिती अशी की, लॉ कॉलेजरोड परिसरात रविवारी मध्यरात्री सुमारास पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल काटकर हे ड्यूटी संपवून घरी परतत असताना, बाईकवर आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्यात आलाय.
प्राथमिक माहितीनुसार, कट मारण्याच्या वादातून हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात पोलीस अमोल काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अमोल काटकर हे ड्युटी संपवून रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घरी जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात पोलीस अमोल काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : शरद पवारांच्या आमदाराला मारहाण झाल्याची चर्चा, अखेर बापूसाहेब पठारे समोर; काय घडलं? सगळं सांगितलं