शरद पवारांच्या आमदाराला मारहाण झाल्याची चर्चा, अखेर बापूसाहेब पठारे समोर; काय घडलं? सगळं सांगितलं

मुंबई तक

Bapusaheb Pathare : शरद पवारांच्या आमदाराला मारहाण झाल्याची चर्चा, अखेर बापूसाहेब पठारे समोर; काय घडलं? सगळं सांगितलं

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांच्या आमदाराला मारहाण झाल्याची चर्चा

point

अखेर बापूसाहेब पठारे समोर; काय घडलं? सगळं सांगितलं

Bapusaheb Pathare, Pune : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण झाल्याची चर्चा कालपासून (शनिवार ,दि.4) सोशल मीडियावर रंगली आहे. याबाबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी निषेध देखील व्यक्त केला होता. मात्र, आता खुद्द बापूसाहेब पठारे यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. बापूसाहेब पठारे काय म्हणाले? जाणून घेऊयात... 

हेही वाचा : पाझर तलावात पोहण्यासाठी गेला, पण पाण्याचा अंदाज न आल्याने 12 वर्षीय तरुण बुडाला; जालन्यातील दुर्दैवी घटना

माझी कॉलर पकडली, ड्रायव्हर आणि बॉडीगार्डला मारहाण केली 

बापूसाहेब पठारे म्हणाले, काल दिवसभरात माझे कार्यक्रम सुरु होते. काल रात्री मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. लोहगाव या ठिकाणी बंडू खांडवे मुलं घेऊन आला होता. त्याने सुरु केले होते. तो त्याठिकाणी आला. आम्हाला म्हणाला, मी आंदोलन करतोय, तुम्हाला काय त्रास झाला? मी त्याला म्हटलं तू राजकारण करु नको. मी काही करत नाही. मात्र, त्याचा काय प्लॅन होता माहिती नाही. त्याने माझी कॉलर धरली. मला मारण्याचा प्रयत्न सुरु केला. माझ्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. माझी कॉलर पकडत होता, माझ्या ड्रायव्हरला मारत होता. माझ्या बॉडीगार्डलाही मारहाण झाली. त्यानंतर थोड्याच वेळात आणखी 10-12 जण आले. त्यांनी माझ्या ड्रायव्हरला लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. बघता-बघता 50-100 लोक त्याने जमा केली. आम्ही पाहुणे म्हणून तिथे एका कार्यक्रमाला गेलो होतो. माझ्या भावाला देखील मारहाण करण्यात आली. 

पुढे बोलताना बापूसाहेब पठारे म्हणाले,  ते अजित पवार गटाचे आहेत. सुनील टिंगरे यांचे ते कार्यकर्ते होते.  मात्र यात त्यांचा हात नाही त्यांचे केवळ कार्यकर्ते होते.  त्यांनी सगळ प्लॅन केलं होतं आधीच लोक जमा केली होती.  पोलीस रात्री गेले होते पण रात्री जबाब नोंदवला गेला नाही आमची लोक जखमी होती. आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.  आंदोलन करणार म्हणून आम्ही शिव्या दिल्या नाहीत, सगळे आंदोलन करू शकतात. निवडणुका डोळ्या समोर ठेवून आमच्यावर हल्ला केला.  वेगळं वातावरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.  माझं सगळ्या नेत्यांशी बोलणं झालं. अजित पवार यांच्याकडे देखील तक्रार देणार आहे.  मारहाण करणाऱ्यांवर ठोक कारवाई झाली पाहिजे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp