पाझर तलावात पोहण्यासाठी गेला, पण पाण्याचा अंदाज न आल्याने 12 वर्षीय तरुण बुडाला; जालन्यातील दुर्दैवी घटना
12 वर्षीय मुलगा पाझर तलावात पोहण्यासाठी गेला असता तिथे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पाण्याचा अंदाज न आल्याने 12 वर्षीय तरुण बुडाला

जालन्यातील दुर्दैवी घटना
Shocking accident: जालन्यात एक दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे 12 वर्षीय मुलगा पाझर तलावात पोहण्यासाठी गेला असता तिथे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. घटनेतील मृत मुलाचं नाव रणवीर विलास राठोड असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील लालवाडी तांडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.
पाण्याचा अंदाज आला नाही...
रिपोर्ट्सनुसार, पीडित तरुण हा लालवाडी तांडा परिसरातील गट क्रमांक 189 मध्ये असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहतेवेळी रणवीरला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला. अशातच, पीडित मुलगा काही क्षणातच पाण्यात बुडाला.
हे ही वाचा: रात्री झोपला असताना पतीची केली निर्घृण हत्या! नंतर, पूर्ण रात्र मृतदेहासोबत... पत्नीने असं का केलं?
तलावात मृतदेह तरंगताना दिसला
बराच वेळ उलटून गेल्यावर सुद्धा रणवीर घरी परतला नाही. त्यावेळी, कुटुंबियांना रणवीरची चिंता वाटू लागली आणि त्यांनी आपल्या मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, रणवीर तलावाजवळ गेल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. त्यावेळी गावातील जवळपास 20 ते 25 तरुण घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तलावात शोध घेण्यास सुरूवात केली. बऱ्याच तासांनंतर, तलावात रणवीरचा मृतदेह तरंगताना आढळला.
हे ही वाचा: पाऊस सुरु असल्याने महिला आडोशाला थांबली, कोणी नसल्याचं पाहाताच ट्रक ड्रायव्हरने उचलून नेलं, अन्...
ग्रामीण प्रशासनाकडे केली मागणी
या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ग्रामीण प्रशासनाकडे तलावाच्या आसपास सुरक्षा व्यवस्था आणि सावधानतेचा इशारा देणारे बोर्ड्स लावण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणासंबंधी आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.