रात्री झोपला असताना पतीची केली निर्घृण हत्या! नंतर, पूर्ण रात्र मृतदेहासोबत... पत्नीने असं का केलं?
एका संतापलेल्या महिलेने आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, तर आरोपी महिला पूर्ण रात्र तिच्या मुलांसोबत पतीच्या मृतदेहाजवळ बसून राहिली. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रात्री झोपला असताना पतीची केली निर्घृण हत्या!

हत्येनंतर पूर्ण रात्र मृतदेहासोबत...

पत्नीचं निर्दयी कृत्य
Crime News: वाराणसीच्या सिगरा पोलीस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका संतापलेल्या महिलेने आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, तर आरोपी महिला पूर्ण रात्र तिच्या मुलांसोबत पतीच्या मृतदेहाजवळ बसून राहिली. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
मिळालेल्या माहितीनुसार, मदरसा बादशाह बाग परिसरात एका 45 वर्षीय दानिश राजा नावाच्या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. खोलीतील भिंती आणि फरशीवर सुद्धा रक्ताचे डाग सापडले. पीडित तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
पतीच्या सततच्या छळाला वेतागली अन्...
पोलिसांच्या तपासादरम्यान, दानिशच्या पत्नीनेच त्याची हत्या केली असल्याचं समोर आलं. आरोपी महिलेची चौकशी केली असता पती सतत छळ करत असून गेल्या काही दिवसांमध्ये त्याने आपल्याला मारहाण केली असल्याचं पत्नीने पोलिसांना सांगितलं. गुरुवारी संध्याकाळी सुद्धा दानिशला त्याच्या पत्नीला मारहाण केली होती. त्यावेळी, महिलेनं पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी, रात्री झोपेच्या वेळेत पत्नीने आधी रॉडने पतीच्या डोक्यावर वार केला आणि नंतर, तिने चाकूने चेहरा, गळा आणि शरीराच्या इतर भागांवर हल्ला केला. अखेर, आरोपी महिलेनं पतीवर खलबत्त्याने वार करून त्याची हत्या केली.
हे ही वाचा: "म्हाडामध्ये दुकान मिळवून देतो..." PMO अधिकारी असल्याची खोटी ओळख अन् 74 लाख रुपये लुबाडले! मुंबईतील धक्कादायक घटना
पडित तरुणाच्या बहिणीने दाखल केली तक्रार
त्या रात्री, पत्नी रात्रभर आपल्या मुलांसोबत पतीच्या मृतदेहाजवळ बसून राहिली. दानिशच्या बहिणीने आपल्या भावाच्या हत्येसंबंधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळी सिगरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.