Crime News : देशात महिलांवरील वाढत्या अत्याचारांनी समाजाच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांतही महिलांच्या सुरक्षेचा अभाव स्पष्टपणे जाणवतोय. दिल्लीतील एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील आदर्श नगर परिसरातील एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने आपल्या मित्रावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेचं म्हणणं आहे की, आरोपीने तिला हॉटेलमध्ये बोलावलं, तिला नशेचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नव्हे तर त्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही काढले.
ADVERTISEMENT
हॉटेलमध्ये नशा देऊन केलेलं कृत्य
अधिकची माहिती अशी की, एमबीबीएस विद्यार्थीनी 9 सप्टेंबर रोजी तिच्या मित्राच्या जाळ्यात अडकली. ती मूळची हरियाणातील जींद जिल्ह्यातील असून दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहात राहून शिक्षण घेत आहे. तर 20 वर्षीय आरोपी अमनप्रीत हा देखील जींद जिल्ह्यातील असून दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. दोघेही एकाच परिसरातील असल्याने पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवला.
महिनाभर ब्लॅकमेल करून अत्याचार सुरूच ठेवले
आरोपीने पार्टीच्या बहाण्याने पीडितेला आदर्श नगरमधील हॉटेल अॅपल येथे बोलावले. तेथे त्याचे दोन मित्रही उपस्थित होते. पीडिता हॉटेलमध्ये पोहोचताच आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध मिसळलं. नशेमुळे ती बेशुद्ध झाली आणि आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ घेतले.
या फोटो-व्हिडिओंचा वापर करून आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जवळपास महिनाभर त्याने हा प्रकार सुरू ठेवला. जर पीडितेने कुणाला सांगितलं किंवा तक्रार केली तर व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू, अशी धमकी देत तो तिला वारंवार बोलावून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. भयभीत झालेली विद्यार्थीनी बऱ्याच दिवसांपर्यंत शांत राहिली. अखेर तरुणी जाचाला कंटाळून पोलीस ठाण्यात पोहोचली असून तिने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
