नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर, राज्यातील 16 नगरपालिका SC महिलांसाठी तर 34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी राखीव
Nagarpalika and Nagarparishad Election Reservation : नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर, राज्यातील 16 नगरपालिका SC महिलेसाठी राखीव, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

राज्यातील 16 नगरपालिका SC महिलेसाठी राखीव
Nagarpalika and Nagarparishad Election Reservation : जानेवारी महिन्याच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायलयाकडून देण्यात आल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या नगरपालिकेचं आरक्षण कोणला जाहीर होणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर आज याबाबतची माहिती समोर आली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदा या अनुसूचीत जातीतील महिलेसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
अनुसूचित जातीतील महिला आरक्षण (नगरपरिषद)
देऊळगावराजा - SC महिलांसाठी राखीव
मोहोळ - SC महिलांसाठी राखीव