शेतकऱ्यासोबत घडलं विचित्र.. पोटच्या मुलावर संशय? चक्रावून टाकणारं प्रकरण

Crime News : शेतकऱ्याचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शेतापासून 200 मीटर अंतरावर त्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती आता समोर आली आहे.

Crime news

Crime news

मुंबई तक

• 10:11 AM • 22 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

point

हत्या कोणी आणि का केली? पोलिसांचा तपास सुरु 

point

शेतकऱ्याच्या मुलाने हत्या केल्याचा संशय

Crime News : शेतकऱ्याचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शेतापासून 200 मीटर अंतरावर त्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती आता समोर आली आहे. परंतु त्याच्या कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना मृतदेह सापडला नाही. संपत्तीच्या वादातून शेतकऱ्याच्या धाकट्या मुलाने हा गुन्हा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचं सांगत आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'त्याने आपल्या बहिणीलाही सोडलं नाही तिच्यासोबत...' बापानेच मुलाच्या डोक्यात विट घालून दोघांना हाताशी धरत संपवलं

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

ही घटना उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील गोराह अंतू येथील आहे. मृत शेतकऱ्याचे नाव शिवशंकर शुक्ला (वय 50) असे आहे. शनिवारी रात्री ते एका शेतात बांधलेल्या शेडमध्ये झोपले होते. रात्री 8 वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी जेवण करून परतली असता, त्या ठिकाणी शिवशंकर नव्हतेच. त्यांना कसलीही माहिती न देताच ते तिथून निघून गेले होते. सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. हत्येची बातमी पसरताच गर्दी जमली. त्यांची पत्नी आली तेव्हा मृतदेह पाहून महिलेनं आरडाओरड केली. 

हत्या कोणी आणि का केली? पोलिसांचा तपास सुरु 

त्याची हत्या कोणी आणि का केली याचा तपास पोलिसांनी सुरु केला तेव्हा त्यांना धाकटा मुलगा शिवम याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी रक्ताचे डाग आणि चप्पल आढळली. मृतदेहाजवळ एक रिकामा सिरिंज देखील आढळली. पोलिसांनी सायंकाळी उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शेतकऱ्यांची पत्नी रंजना शुक्ला यांच्या तक्रारीवरून तपास सुरु करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : अभिजीत बिचुकलेंनी ठोकले शड्डू, साताऱ्याला सितारा करणार म्हणत, उदयनराजेंचं नाव न घेता म्हणाले, मलाही...

शिवशंकरच्या मुलाने हत्या केल्याचा संशय

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना शिवशंकरच्या मुलाने हत्या केल्याचा संशय आहे. अशातच आता पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. शिवशंकरला दोन मुलं आहेत, त्यापैकी एक मुलगा राहुल हा दिल्लीत राहतो. तर त्याचा धाकटा मुलगा शिवम हा कुटुंबासोबतच राहत असल्याची माहिती समोर आली. 

    follow whatsapp