अभिजीत बिचुकलेंनी ठोकले शड्डू, साताऱ्याला सितारा करणार म्हणत, उदयनराजेंचं नाव न घेता म्हणाले, मलाही...

मुंबई तक

Abhijet bichukale : साताऱ्याला सितारा बनवण्यासाठी मला एक संधी द्या असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते आज रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता सातारा येथील नगरपालिकेत बोलत होते. 

ADVERTISEMENT

Abhijet bichukale
Abhijet bichukale
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय म्हणाले अभिजीत बिचुकले? 

point

'साताऱ्याचा विकास नव्हे तर भकास झाला'

Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम आणि कवी मनाचे नेते म्हणून अभिजीत बिचुकले यांची एक ओळख आहे. ते नेहमी कोणत्यानं कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिचुकले यांनी साताऱ्यात थेट नगराध्यक्षपदासाठी शड्डू ठोकले आहेत. त्यांनी नुकतंच साताऱ्याला सितारा बनवण्यासाठी मला एक संधी द्या असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते आज रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता सातारा येथील नगरपालिकेत बोलत होते. 

हे ही वाचा : 'त्याने आपल्या बहिणीलाही सोडलं नाही तिच्यासोबत...' बापानेच मुलाच्या डोक्यात विट घालून दोघांना हाताशी धरत संपवलं

नेमकं काय म्हणाले अभिजीत बिचुकले? 

सातारकरांना मी सांगू इच्छितो की, लोकसेवेच व्रत 2004 सालापासून घेतलं आहे. प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मी तुमच्या विकासासाठी लढलो. मी माझ्या क्षेत्रात मनगटावर माझं नाव कमावलं आहे. मी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवतोय. हे नगराध्यक्षपद खुल्या वर्गातून थेट आहे. 

'साताऱ्याचा विकास नव्हे तर भकास झाला'

त्यासाठी आपण साताऱ्याचा विचार केल्यास, 100 किमी अंतरावर नोकरीसाठी सातारकर जात असतात, सध्या जर साताऱ्यात पाणी आणि जमीन सुपीक असल्याने सर्वच गोष्टींमध्ये आपण संपन्न आहोत, पण कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती नसल्याने साताऱ्याचा विकास नव्हे तर भकास झाला असल्याचं वक्तव्य अभिजीत बिचुकले यांनी केलं. 

हे ही वाचा : तरुणाने 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीशी केली मैत्री, नंतर मित्राच्या फ्लॅटवर नेत नको तेच केलं अन्...

त्यानंतर अभिजीत बिचुकले यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह राजे यांचे नाव न घेताच वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, थोरले बंधु आहेत आमचे त्यांच्याकडे खासदारकी आहे, तसेच दुसऱ्यांकडे आमदारकी आहे, आता मला द्या. हा विकास माझा नसून तुमचा होणार असल्याचं अभिजीत बिचुकले म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp