'त्याने आपल्या बहिणीलाही सोडलं नाही तिच्यासोबत...' बापानेच मुलाच्या डोक्यात विट घालून दोघांना हाताशी धरत संपवलं
sexually abuses : वडिलांनी दोन मित्रांच्या मदतीने आपल्याच लेकाची हत्या केली आहे. त्यानंतर वडिलांनी दोघांविरुद्ध मुलाच्या हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, वडिलांवर संशय बळावला गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आरोपीवर विनयभंग, बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत इतर तीन खटले
'त्याने आपल्या बहिणीला देखील सोडलं नाही...' वडिलांचा लेकावर आरोप
नेमकं प्रकरण काय?
sexually abuses : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये वडिलांनी दोन मित्रांच्या मदतीने आपल्याच लेकाची हत्या केली आहे. त्यानंतर वडिलांनी दोघांविरुद्ध मुलाच्या हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, संशयाची सुई ही थेट वडिलांवर गेली. त्यानंतर वडिलांनी आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव सलमान असे होते. तर हत्या करणाऱ्या वडिलांचे नाव नफीस, तर इतर दोघांचे नाव शामशाद आणि महावीर असे आहे.
हे ही वाचा : तरुणाने 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीशी केली मैत्री, नंतर मित्राच्या फ्लॅटवर नेत नको तेच केलं अन्...
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणात नफीस, शामशादा आणि महावीर यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण बिजनौर जिल्ह्यातील स्योहार पोलीस ठाणे हद्दीतील बुधेरन गावातील आहे. अशातच 9 नोव्हेंबर रोजी एका आंब्याच्या बागेत प्लास्टिकच्या पिशवीत पॅक केलेला सलमानचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपीवर विनयभंग, बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत इतर तीन खटले
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर सलमानवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्याची सुटका झाली होती. त्यांच्याविरुद्ध विनयभंग, बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत इतर तीन खटले न्यायालयात प्रलंबित होते. या प्रकरणात पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि पाळत ठेवत त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली असता, कुटुंबातील सदस्य दु:खी दिसत नव्हते.
पोलिसांनी घरातील महिलांची चौकशी केली असता, त्या सर्वांनी सलमानला चारित्र्यहिन असल्याचे सांगितलं. तसेच तो नेहमीच जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असे. या प्रकरणात पोलिसांनी सलमानचे वडील नफीस यांची चौकशी केली असता, त्यांना रडू कोसळले.










