लगेच आले असं सांगून शॉपिंगला गेली तरुणी, दाजीनं डाव साधत मेहुणीला पळवलं, मोबाईलही ठेवले बंद, मेहुण्याला संशय बळावल्यानं...

crime news : मेहुणीचं आणि तिच्याच बहिणीच्या पतीचं म्हणजेच भाऊजीचं एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघेही एकमेकांशिवाय राहत नव्हती. तेव्हा दोघांनीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन एक प्लान रचला आणि घर सोडून निघूल गेले होते.

crime news

crime news

मुंबई तक

06 Oct 2025 (अपडेटेड: 06 Oct 2025, 09:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना

point

दाजीने मेहुणीला नेलं पळवून

Crime News : उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुणीचं आणि तिच्याच बहिणीच्या पतीचं म्हणजेच भाऊजीचं एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघेही एकमेकांशिवाय राहत नव्हते. दोघांनीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन एक प्लान रचला आणि घर सोडून निघूल गेले होते. मेहुणीच्या भावाने पोलीस ठाणे गाठून आपल्या दाजीविरोधात तक्रार दाखल केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मला टीम इंडियातील खेळाडूला मारायचंय...', मुलाखतीदरम्यान पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

दाजी विरोधात तक्रार

या प्रकरणात पीडित महिलेच्या भावाने पोलीस ठाण्यात आपल्याच दाजीविरोधात तक्रार दाखल केली. हे प्रकरण खरगुपूर पोलीस ठाणे परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात याच घटनेची चर्चा होताना दिसते. पीडितेच्या भावाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केलं की, 30 नोव्हेंबर 2024 रोजी त्याची बहीण लुधियानाहून गोंडाला आली. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास, दोघेही शहर रेल्वे स्थानकावरून जय नारायण चौकाकडे जात होते. त्याची बहीण दुकानातून काहीतरी खरेदी करण्याच्या बहाण्याने थांबली, ती म्हणाली इथं थांबा, मी पुन्हा परत येते. 

मेहुणीला नेलं पळवून 

दरम्यान, याचवेळी तरुणाच्या दुसऱ्या बहिणीचा पती घटनास्थळीच होता, त्यानेच आपल्या बहिणीला गोड बोलून जाळ्यात ओढून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर त्यांनी मोबाईल फोनही बंद केले. तसेच त्यानंतर त्याने कोणाशीही कसलाही संपर्क साधला नाही. त्यानंतर शोधाशोध केली, पण कसलीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर तरुणाने पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : विरार हादरलं! अज्ञातांनी पहाटे तीनच्या सुमारास मुलीसह आई वडिलांवर चॉपरने केले वार, तिघेही रक्ताच्या थारोळ्यात, हल्ल्याचं कारण काय?

संबंधित प्रकरणात नगर कोतवाली पोलीस ठाण्यात भावाच्या सांगण्यावरून पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. पोलिसांचं म्हणणं आहे की, परिस्थिती पाहून पोलीस पथकांनी शोधमोहिम करत तरुणीला ताब्यात घेतलं. तांत्रिक उपकरणे, तसेच मोबाईल लोकेशनचा वापर केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

    follow whatsapp