Pune Crime : पुणे शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांसोबतच आता पोलीस कर्मचारीही असुरक्षित झाल्याचे चित्र समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल काटकर यांच्यावर रविवारी (दि.5) मध्यरात्री धारदार शस्त्राने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना लॉ कॉलेज रोड परिसरात घडली.
ADVERTISEMENT
ड्युटी संपवून घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तरुणांकडून हल्ला
अधिकची माहिती अशी की, लॉ कॉलेजरोड परिसरात रविवारी मध्यरात्री सुमारास पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल काटकर हे ड्यूटी संपवून घरी परतत असताना, बाईकवर आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्यात आलाय.
प्राथमिक माहितीनुसार, कट मारण्याच्या वादातून हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात पोलीस अमोल काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अमोल काटकर हे ड्युटी संपवून रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घरी जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात पोलीस अमोल काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : शरद पवारांच्या आमदाराला मारहाण झाल्याची चर्चा, अखेर बापूसाहेब पठारे समोर; काय घडलं? सगळं सांगितलं
पुण्यातील कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
प्राथमिक माहितीनुसार, कट मारल्याच्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र हल्लेखोर कोण होते आणि त्यांचा हेतू नेमका काय होता, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांचा आत्मविश्वास इतका वाढला आहे की ते आता पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, अशी नागरिकांत चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अमोल काटकर यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष असून त्यांची स्थिती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.इतर महत्त्वाच्या बातम्या
दोन मुली इमारतीत खेळत असताना इस्टेट एजंट करू लागला अश्लील चाळे, धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद
ADVERTISEMENT
