दोन मुली इमारतीत खेळत असताना इस्टेट एजंट करू लागला अश्लील चाळे, धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद
Mumbai Crime : मुंबईतील अंधेरीत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाने 2 लहान मुलींसोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं अंधेरी हादरून गेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील अंधेरीत धक्कादायक प्रकरण

2 लहान मुलींसोबत अश्लील कृत्य

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हैवानी कृत कैद
Mumbai Crime : मुंबईतील अंधेरीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाने 2 लहान मुलींसोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं अंधेरी हादरून गेली आहे. आरोपीने केलेलं हैवानी कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील कैद झालं आहे. त्यात तरुण हा पीडित लहान मुलीला जबरदस्ती ओढून घेऊन जात होता. त्याच आरोपीचं नाव राजन जाधव (58) असे आहे. तो रिअल इस्टेट एजंट असल्याचं समजतंय.
हे ही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर, दोन्ही भावांमध्ये नेमकी चर्चा काय?
रियल इस्टेट एजंटकडून लहान मुलींची छेडछाड
लहान मुलगी ही अंधेरी पूर्वच्या चकाला परिसरातील कनकिया वॉल स्ट्रीट या इमारतीत खेळत होती. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान एका रियल इस्टेट एजंटने खेळत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींसोबत छेडछड केली. या घटनेचा एकूण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.
इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि पालकांच्या सतर्कतेमुळे, पालकांनी विनयभंग करणाऱ्या नराधमाला ताबडतोब ताब्यात घेतले आणि एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
हे ही वाचा : पुणे हादरलं! वाघोलीत खूनाचा थरार, तरुणाचं डोकं दगडानं ठेचून केलं ठार, पहाटे नेमकं काय घडलं?
पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक केली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं अंधेरीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.