Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कैराना येथील खैलकला परिसरात राहणाऱ्या सलमानने आपल्या चार लहान मुलांसह यमुना नदीत उडी मारून आत्महत्या केली. सलमानची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती, त्यामुळे तो अत्यंत मानसिक तणावात होता. नदीत उडी मारण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ तयार करून आपल्या बहिणीला पाठवला होता. या व्हिडिओमध्ये त्याने आपबिती सांगितली होती. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
पत्नीवर गंभीर आरोप
सलमानने आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या. त्याने सांगितले की, “माझ्या पत्नीने मागील सात महिन्यांपासून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे मला हा शेवटचा निर्णय घ्यावा लागत आहे.” पुढे त्याने म्हटलं की, “आता मला आणि माझ्या मुलांना सरकारकडून काहीही अपेक्षा नाही. त्यामुळे मी पाच जणांचे जीवन संपवतोय.” त्याने पत्नीवर आरोप करताना म्हटलं, “या बाईने माझं आयुष्य नरक करून ठेवलं आहे.”
हेही वाचा : पुणे हादरलं! वाघोलीत खूनाचा थरार, तरुणाचं डोकं दगडानं ठेचून केलं ठार, पहाटे नेमकं काय घडलं?
बहिणीने उघड केले अनेक धक्कादायक प्रकार
मृतकाच्या बहिणीने सांगितलं की सलमानला तीन मुली आणि एक मुलगा होता. तिने सांगितलं की सलमानची पत्नी यापूर्वी चार-पाच वेळा घरातून पळून गेली होती आणि परवा पुन्हा पळाली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. बहिणीने पुढे सांगितले की काल दुपारी साडेबारा वाजता सलमानने घरातून “मी कामावर जातोय” असं सांगून बाहेर पडला. त्याच्या पत्नीने त्याला म्हणाले होते, “मला तुझ्यासोबत राहायचं नाही, माझ्या दृष्टीने तू कुठेही जाऊन मर.” बहिणीने सांगितलं की मरायच्या आधी सलमानने व्हिडिओमध्ये सगळ्यांची नावं घेतली होती.
पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच कैराना पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यमुना नदीत सलमान आणि त्याच्या चारही मुलांच्या मृतदेहांचा शोध सुरू केला. नदीकाठी मोठी गर्दी जमली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतकाची ओळख खैलकला येथील रहिवासी सलमान म्हणून पटली आहे. शामली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की शोधकार्य सुरू आहे आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
