राजकीय दबाव? महाबळेश्वरमधील हॉटेल पुन्हा पोर्शे प्रकरणातील अग्रवाल कुटुंबियांच्या ताब्यात, प्रशासनाचा मोठा निर्णय

मुंबई तक

Porsche car Case Pune Agrawal family : राजकीय दबाव? महाबळेश्वरमधील हॉटेल पुन्हा पोर्शे प्रकरणातील अग्रवाल कुटुंबियांच्या ताब्यात, प्रशासनाचा मोठा निर्णय

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाबळेश्वरमधील हॉटेल अग्रवाल कुटुंबियांच्या ताब्यात

point

राजकीय दबावानंतर निर्णय झाल्याची चर्चा

Porsche car Case Pune Agrawal family : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचं शासकीय जागेवर उभं असलेलं अनाधिकृत MPG club हॉटेल वर्षभरापूर्वी प्रशासनाने सील केलं होतं. मात्र, आता हे हॉटेल आता प्रशासनाने पुन्हा एकदा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलं आहे.  मोठ्या राजकीय दबावानंतर या हॉटेलचे सील काढून अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 

महाबळेश्वर हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबियांच्या ताब्यात

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन समोर आलं होतं. त्यानंतर खडबडून जागं होत प्रशासनाने कारवाई केली होती. शासकीय मिळकतीमध्ये तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यानं रहिवास वापराकरीता घेतलेल्या जागेमध्ये उभारण्यात आलेलं पंचतारांकित हॉटेल वर्षभरापूर्वी सील करण्यात आलं होतं. अनधिकृत पद्धतीने केलेलं बांधकाम पाडून या हॉटेलमधला बार सुद्धा प्रशासनाने सील केला होता. याला जवळपास एक वर्ष उलटून गेल आहे. मात्र सातारा जिल्हा प्रशासनान अगदी गुप्त पद्धतीने आदेश काढत हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलं आहे.

हेही वाचा : "म्हाडामध्ये दुकान मिळवून देतो..." PMO अधिकारी असल्याची खोटी ओळख अन् 74 लाख रुपये लुबाडले! मुंबईतील धक्कादायक घटना

राजकीय दबाव असल्याने हॉटेल पुन्हा अग्रवाल यांना दिल्याची चर्चा 

शासकीय मिळकतीमध्ये भाडेपट्ट्याने असलेली या अग्रवाल कुटुंबाची जागा पुन्हा शासनाने माघारी घ्यावी, अशी मागणी तेव्हापासून होत होती. सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची फसवणूक करत उभारलेल्या या हॉटेलचं  सील काढून ते पुन्हा अग्रवाल कुटुंबालाच का? देण्यात आलं याबाबत उलट सुलट चर्चा सध्या सुरू झालेली आहे. मोठा राजकीय दबाव जिल्हा प्रशासनावर होता, असे सुद्धा बोलले जात आहे. जर राजकीय दबाव होता तर कोणत्या नेत्याचा होता हे सुद्धा समोर यावं असं लोकांचं म्हणणं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp