आरोपी घरातच दबा धरुन बसला अन् महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून अत्याचार, बीडमधील संतापजनक घटना

Beed Crime : आरोपी घरातच दबा धरुन बसला अन् महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून अत्याचार, बीडमधील संतापजनक घटना

Mumbai Tak

मुंबई तक

07 Oct 2025 (अपडेटेड: 07 Oct 2025, 09:21 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून अत्याचार

point

बीडमधील संतापजनक घटना

Beed Crime : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका महिलेशी अमानुषपणे अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावात 47 वर्षीय विवाहित महिलेच्या घरात घुसून एका आरोपीने तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि तिच्यावर विनयभंग करत अत्याचार केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपीने पळ काढलाय. विकास गोरे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. 

हे वाचलं का?

आरोपी घरात दबा धरुन बसला, महिला येता मिरचीची पूड टाकली 

अधिकची माहिती अशी की, शेतातील काम आटोपून पीडित महिला घरी परतली. तिने घराचे कुलूप उघडताच, पाळत ठेवून बसलेला आरोपी विकास बबन गोरे घरात घुसला. अचानक डोळ्यांवर मिरचीची पूड टाकून त्याने महिलेला जमिनीवर पाडलं आणि तिचा विनयभंग करत अत्याचार केला. या अनपेक्षित हल्ल्याने महिला घाबरून ओरडू लागली.

हेही वाचा : संतोष देशमुखांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचे बॅनर झळकवून पैसे मागणारा आहे तरी कोण?

महिलेच्या आरडाओरडीनंतर तिचा पती, भाऊ आणि भाचा घटनास्थळी धावून आले. मात्र आरोपीने तिघांनाही मारहाण केली आणि “एका-एकाला गाठून जीवे मारीन” अशी धमकी दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेचा जबाब नोंदवला. दरम्यान, महिला अत्याचाराच्या या घटनेने संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरु 

या प्रकरणी विकास बबन गोरे याच्याविरोधात विनयभंग, बलात्कार आणि धमकी देण्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केलं असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे आणि आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.इतर महत्त्वाच्या बातम्या 

    follow whatsapp