प्रियकराच्या नादाला लागली अन् नको ते करून बसली! मामा-मामीसोबतच केला कांड...

एका तरुणीने प्रियकरासोबत लग्न करण्याच्या नादात आपल्या कुटुंबियांचा विश्वासघात केल्याचं सांगितलं जात आहे. तिने आपल्या मामा-मामींसोबत धक्कादायक कृत्य केल्याचं वृत्त आहे.

मामा-मामीसोबतच केला कांड!

मामा-मामीसोबतच केला कांड!

मुंबई तक

• 03:36 PM • 06 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराच्या नादाला लागली अन् नको ते करून बसली!

point

तरुणीने मामा-मामीसोबतच केला कांड...

Crime News: उत्तर प्रदेशातील इटावा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीने प्रियकरासोबत लग्न करण्याच्या नादात आपल्या कुटुंबियांचा विश्वासघात केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित तरुणीने प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी आपल्याच मामा-मामीच्या घरात जवळपास 30 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचं उघडकीस आलं आहे. इतकेच नव्हे तर, तिने चोरी केलेले सर्व दागिने तिच्या प्रियकराला दिले. त्यानंतर, दोघेही पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. 

हे वाचलं का?

मामाच्या घरातून दागिने चोरले अन्... 

संबंधित घटना ही बकेवर हद्दीतील इंद्राउखी गावात घडली. येथील रहिवासी असलेल्या कामिनी नावाच्या महिलेने पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, तिच्या घरातील सोन्या-चांदीचे अचानक गायब झाले असून या दागिन्यांची किंमत जवळपास 30 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांनी या चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि कुटुंबातील व्यक्तीनेच चोरी केल्याचं तपासातून समोर आलं. 

दरम्यान, पोलिसांना कामिनीच्या घरात राहणाऱ्या तिच्या भाचीवर संशय निर्माण झाला आणि त्यानंतर, तिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांकडून अटक करण्यात आली. शेवटी, चौकशीदरम्यान दोघांनी घरातील दागिने चोरल्याचं कबूल केलं आणि सत्य उघडकीस आलं. 

हे ही वाचा: Govt Job: तब्बल 1.20 लाखांहून अधिक उमेदवारांना रेल्वेत नोकरी! रेल्वे मंत्र्यांनीच दिली महत्त्वाची माहिती...

प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत 

पोलिस तपासात समोर आलं की, आरोपी भाची गेल्या काही महिन्यांपासून तिच्या मामा आणि मामीसोबत राहत होती. दरम्यान, तिच्या मावशीने तिचे मौल्यवान दागिने नेमके कुठे ठेवले आहेत? हे माहीत होतं. संधी साधून तिने हळूहळू दोन ते तीन महिन्यांत सर्व दागिने चोरले आणि ते तिच्या प्रियकर योगेशला दिले. योगेश तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन देऊन वारंवार प्रेयसीकडे दागिने मागत होता. मामीचे सर्व दागिने मिळाल्यानंतर, ते पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली. 

हे ही वाचा: "आधी अपहरण, बलात्कार अन् नंतर हत्या..." नर्सिंगच्या विद्यार्थीनीसोबत नेमकं काय घडलं?

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपींकडून सोन्याची चेन, मंगळसूत्र, अंगठ्या, पैंजण, कंबरपट्टा, झुमके आणि इतर काही दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांची एकूण किंमत जवळपास 30 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. 

    follow whatsapp