एक महिना क्राईम पेट्रोल पाहिलं अन् MBA च्या विद्यार्थ्याने मोठा कट रचला, सराफ व्यापाऱ्याचं हत्याप्रकरण उलगडलं

Crime Petrol serial jeweller murder planning : आरोपीला सर्वप्रथम गिरधारीलाल यांचे धाकटे चिरंजीव रूपेंद्र यांनी पकडले. स्वतःला सोडवण्यासाठी अंकितने त्यांच्यावरही हल्ला केला, तरी रूपेंद्र यांनी पकड सैल केली नाही.

Crime Petrol serial jeweller murder planning

Crime Petrol serial jeweller murder planning

मुंबई तक

06 Dec 2025 (अपडेटेड: 06 Dec 2025, 03:27 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एक महिना क्राईम पेट्रोल पाहिलं

point

अन् MBA च्या विद्यार्थ्याने मोठा कट रचला

point

हत्याकांड कसं समोर आलं?

Crime Petrol serial jeweller murder planning : गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर येथील गोविंदपुरी कॉलनीत सराफ दुकानात घुसून सोनाराची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा कट रचण्यासाठी आरोपीने तब्बल एक महिना क्राईम पेट्रोलचे एपिसोड पाहिले होते. क्राईम पेट्रोल पाहून तो खुनाचा कट रचत होता. घटना घडण्याच्या एक तास आधी त्याने दुकानाजवळ फिरून रेकीही केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून त्याची रवानगी तुरुगांत करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

गोविंदपुरी कॉलनीतील छोट्या मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी सराफ व्यापारी गिरधारीलाल सोनी यांची दुकानात घुसून हत्या करण्यात आली होती. आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात मृताचे चिरंजीव रूपेंद्र सोनी जखमी झाले. मात्र, उपस्थित नागरिकांनी आरोपी अंकित गुप्ता (रा. मोदिपोन कॉलनी) याला धरून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे संतप्त व्यापाऱ्यांनी तीन तासांहून अधिक काळ तीव्र आंदोलन केले. मृत गिरधारीलाल यांचा दुसरा मुलगा देवेंद्र सोनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

क्राईम पेट्रोल पाहून शिकला पोलीसांच्या हातातून सुटण्याचे डावपेच

आरोपी अंकित गुप्ता एमबीए शिक्षित असून अनेक कंपन्यांमध्ये नोकरी केलेली आहे. त्याला ऑनलाईन गेम्सचे व्यसन लागले होते. या व्यसनामुळे त्याच्यावर 50 लाखांहून अधिक कर्ज झाले. घर विकल्यानंतरही कर्जाचे ओझे हलके झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी त्याने लूट करण्याची योजना आखली आणि त्यासाठी तो एक महिना ‘क्राईम पेट्रोल’ चे भाग पाहत राहिला. मालिकेतून गुन्हा करून पोलिसांना चकवा देण्याचे तंत्र त्याने शिकले. पुरावे राहू नयेत म्हणून त्याने हातांच्या बोटांवर टेप लावली होती. शिवाय ऑनलाइन ऑर्डरद्वारे दोन सुरी, चाकू, चापड आणि खेळण्याच्या पिस्तुलाची खरेदी केली होती.

हेही वाचा : अनैतिक संबंधाचा संशय पण भयानक सस्पेन्स, शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा मल्याळम सिनेमा, IMDb वर 7.3 रेटिंग

शहर सोडून पळून जाण्याची तयारी

चौकशीमध्ये आरोपीने सांगितले की, एका आठवड्यात त्याने अनेक वेळा गिरधारीलाल यांच्या दुकानाची रेकी केली होती. जर लूट यशस्वी झाली असती तर तो ताबडतोब शहराबाहेर पळून जाणार होता. घटनेनंतर पीडितांच्या घरी सतत नागरिक, नातेवाईक आणि व्यापारी दिलासा देण्यासाठी जात असल्याचे दिसते.

मारहाणीमुळे गंभीर जखमा

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला सर्वप्रथम गिरधारीलाल यांचे धाकटे चिरंजीव रूपेंद्र यांनी पकडले. स्वतःला सोडवण्यासाठी अंकितने त्यांच्यावरही हल्ला केला, तरी रूपेंद्र यांनी पकड सैल केली नाही. आवाज ऐकून जमलेल्या गर्दीने आरोपीला पकडून चोप दिला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि दोन्ही हातांमध्ये चार ठिकाणी फ्रॅक्चर झाले. उपचारानंतर शुक्रवारी पोलिसांनी आरोपीला न्यायालयाच्या आदेशानुसार जेलमध्ये पाठवले.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

शुक्रवारी न्यायालयाने अंकित गुप्ता याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये पाठवले. पोलिसांनी रिमांडची मागणी केलेली नाही. गुरुवारी सकाळी गुन्ह्यानंतरच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आवश्यक वाटल्यास पुढील काळात रिमांडसाठी अर्ज केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. एसीपी मोदीनगरचे एसीपी अमित सक्सेना म्हणाले, “आरोपीकडून दोन सुरी, एक कात्री आणि मिरची पावडर जप्त करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.”

इतर महत्त्वाच्या बातम्या

सावंतवाडी : शिकारीसाठी गेल्यानंतर समोर प्राणी आल्याचा भास, अन् चुकून सोबत आलेल्या मित्राच्या छातीवर गोळी झाडली

    follow whatsapp