चंद्रपूर: सुखी संसार सुरू असताना परपुरुषाशी तार जुळले, प्रेमासाठी आणाभाका अन् दोघांनी मिळून नवऱ्याला संपवलं

एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे. पीडित तरुणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

प्रेमासाठी आणाभाका अन् दोघांनी नवऱ्याला संपवलं

प्रेमासाठी आणाभाका अन् दोघांनी नवऱ्याला संपवलं

मुंबई तक

07 Dec 2025 (अपडेटेड: 07 Dec 2025, 01:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुखी संसार सुरू असताना परपुरुषाशी तार जुळले

point

प्रेमासाठी आणाभाका अन् दोघांनी मिळून नवऱ्याला संपवलं

Murder Case: चंद्रपुरातील राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे. पीडित तरुणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. शनिवारी (6 डिसेंबर) तालुक्यातील हरदोना (बु.) येथे ही भीषण घटना घडली. मृत तरुणाचं नाव राजेश नारायणलाल मेघवंशी असं असून पोलिसांनी आरोपी महिला दुर्गा मेघवंशी (33) आणि तिचा प्रियकर चंद्रप्रकाश मेघवंशी (40) यांना अटक केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

रोजगारासाठी हरदोना गावात गेला अन्... 

या प्रकरणासंदर्भात मृताच्या चुलतभावाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी राजेशचं दुर्गा नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. दोघेही मूळचे राजस्थान येथील रहिवासी होते. गेल्या वर्षी, ब्लास्टिंगच्या कामातून रोजगार मिळवण्यासाठी राजेश मेघवंशी आपल्या पत्नीसोबत हरदोना गावात गेला होता. त्या काळात, मृताच्या पत्नीचे म्हणजेच दुर्गाचे तिथे काम करणाऱ्या चंद्रप्रकाश मेघवंशी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर, काही महिन्यांनी राजेश आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा गावी परतला. 

हे ही वाचा: वर्धा: घरात आई-वडिलांचे सतत वाद... डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलीने विषारी वायू गिळून संपवलं आयुष्य!

सहा महिन्यांपूर्वी प्रियकराने पत्नीला पळवून नेलं 

जवळपास सहा महिन्यांपूर्वी, चंद्रप्रकाशने दुर्गाला राजस्थानमधून पळवून नेलं होतं. यासंबंधी, पीडित पतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली होती. दरम्यान, दुर्गा ही तिच्या प्रियकरासोबत राजुरा तालुक्यातील हरदोना येथे असल्याची राजेशला माहिती मिळाली आणि 5 डिसेंबर रोजी आपल्या पत्नीचा शोध घेत राजेश हरदोना येथे पोहोचला. त्यावेळी, हरदोना येथील अंबुजा सिमेंट कंपनीजवळ मजुरांच्या घरासोबत राजेशने चंद्रप्रकाशला 'माझ्या पत्नीला पळवून का नेलं?' असा जाब विचारला. दोघांमध्ये मोठा वाद झाला. 

हे ही वाचा: लातूर: कॅफेत नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार! जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेचालकांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल...

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 

वाद सुरू असताना आरोपी महिलेने तिच्या प्रियकराच्या हातात तलवार दिली आणि त्या तलवारीने चंद्रप्रकाशने राजेशच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात राजेश गंभीररित्या जखमी होऊन जमिनीवर कोसळला आणि त्याचा जगीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी राजेशचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर, प्रकरणासंबंधी अधिक कारवाई करत पोलिसांनी आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा केला असून तपास सुरू असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp