Crime News: उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून एक अजब प्रेम प्रकरण समोर आलं आहे. येथे चार मुलांची आई असलेली एक महिला पतीचं घर सोडून तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं वृत्त आहे. यासंबंधी महिलेच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे. अखेर, पोलिसांचा दबाव वाढल्याने आरोपी महिला तिच्या प्रियकरासोबत पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिथे तिला तिच्या पतीसोबत राहायचं नसल्याचं तिने सांगितलं. 20 नोव्हेंबर रोजी संबंधित महिला तिच्या घरातून बेपत्ता झाली होती.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचं नाव मनीषा असून तिला चार मुलं आहेत. घरातून पळून गेल्यानंतर ती तिचा प्रियकर योगेंद्र याच्यासोबतच राहत होते. संबंधित महिलेचे तिच्या शेजारील गावात राहणाऱ्या पुरुषासोबत ओळख झाली आणि त्यानंतर, त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
हे ही वाचा: मालेगाव पुन्हा हादरलं! 13 वर्षीय दिव्यांग मुलीवर व्यावसायिकाकडून लैंगिक अत्याचार, निर्जन ठिकाणी नेलं अन्...
सोशल मीडियावर पुरुषासोबत जुळले सूत अन्...
आरोपी महिला तिच्या चार मुलांसोबत आनंदात राहत होती. पतीसुद्धा मेहनतीचं काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. मात्र, पती घरी नसल्यावर महिलेने सोशल मीडियावर ओळख झालेल्या पुरुषासोबत चॅटिंग करणं सुरू केलं. अशातच, संबंधित पुरुषासोबत दररोज बोलणं होत असतानाच चार मुलांची आई असलेल्या महिलेचं त्याच्यावर प्रेम जडलं आणि कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अखेर, महिलेने पतीला सोडून प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा: ठाणे: घटस्फोट देण्यासाठी पतीचा नकार, वैतागलेल्या पत्नीने पतीलाच संपवलं! हायवेजवळ आढळला अर्धवट जळालेला मृतदेह...
चार मुलांचा देखील विचार केला नाही
20 नोव्हेंबर रोजी पती कामावरून घरी परतल्यानंतर त्याला त्याची पत्नी घरात कुठेच दिसली नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर सुद्धा महिला सापडली नाही. अखेर, पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केल्यानंतर, ती आपल्या प्रियकरासोबत पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यावेळी महिलेने तिला तिच्या प्रियकरासोबतच राहण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. कुटुंबियांनी महिलेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण, तिने तिच्या चार मुलांचा देखील विचार केला नाही. सध्या, ती तिच्या प्रियकरासोबत राहण्याच्या विचारावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











