ठाणे: घटस्फोट देण्यासाठी पतीचा नकार, वैतागलेल्या पत्नीने पतीलाच संपवलं! हायवेजवळ आढळला अर्धवट जळालेला मृतदेह...
आपला पती घटस्फोट देण्यासाठी तयार नसल्यामुळे महिलेने त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घटस्फोट देण्यासाठी पतीने नकार दिल्याने निर्घृण हत्या
हायवेजवळ आढळला अर्धवट जळालेला मृतदेह...
Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे आपला पती घटस्फोट देण्यासाठी तयार नसल्यामुळे महिलेने त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. आरोपी पत्नीने तिचे भाऊ आणि आणखी दोन साथीदारांसोबत मिळून योजनेनुसार पतीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी महिलेसह आणखी चार लोकांना अटक केल्याची माहिती आहे. मृत व्यक्तीचं नाव टिप्पन्ना असून ते कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यातील सिरुगुप्पा गावात राहत होते.
महिलेला पतीपासून घटस्फोट हवा होता..
25 नोव्हेंबर रोजी मुंबई-नाशिक हायवेजवळ पोलिसांना एक अर्धवट जळालेला आणि कुजलेला मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, तपासादरम्यान पीडित तरुणाचे त्याची पत्नी हसिना मेहबूब शेखसोबत सतत कौटुंबित वाद होत असल्याचं समोर आलं. दोघे एकमेकांपासून वेगळे राहत असून हसीनाला आपल्या पतीपासून घटस्फोट हवा होता. मात्र, टिप्पन्नाने घटस्फोट देण्यासाठी स्पष्ट नकार दिला आणि याच कारणामुळे पतीची निर्दयी हत्या करण्यात आली.
भाऊ आणि साथीदारांसोबत मिळून पतीच्या हत्येची योजना
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिचा 35 वर्षीय भाऊ फैयाज जाकिर हुसैन शेख आणि आणखी दोन साथीदारांसोबत मिळून पतीच्या हत्येची योजना आखली. प्लॅनिंगनुसार, 17 नोव्हेंबर रोजी फैयाज त्याच्या साथीदारांसोबत मिळून पीडित टिप्पन्नाला घेऊन फिरायला गेला. आरोपी त्याला शहापूरजवळील एका निर्जन जंगलात घेऊन गेले आणि तिथेच त्याची हत्या करण्यात आली.
हे ही वाचा: भाजप नेत्याकडून 'त्या' मागणीसाठी छळ, त्रासाला कंटाळून नृत्यांगणा दिपाली पाटीलची आत्महत्या; FIR मधून सगळं समोर
हत्येनंतर, आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित तरुणाचा मृतदेह पूर्णपणे जळला नाही. त्यानंतर, आरोपींनी तो मृतदेह हायवेच्या कडेला फेकून दिला.










