भाजप नेत्याकडून 'त्या' मागणीसाठी छळ, त्रासाला कंटाळून नृत्यांगणा दिपाली पाटीलची आत्महत्या; FIR मधून सगळं समोर
Dancer Deepali Patil commits suicide Case : पोलिसांनी रात्रीच पंचनामा करून दुसऱ्या दिवशी सकाळी शवविच्छेदन केले. डॉक्टरांनी दिपालीचा मृत्यू गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नमूद केले. दिपालीचा मृतदेह आई आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून अंत्यविधीसाठी कल्याण येथे होणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजप नेत्याकडून 'त्या' मागणीसाठी छळ
त्रासाला कंटाळून नृत्यांगणा दिपाली पाटीलची आत्महत्या
FIR मधून सगळं समोर
Dancer Deepali Patil commits suicide Case ,अहिल्यानगर : जामखेड येथील नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील (वय 34) हिने छळ, मानसिक त्रास आणि सततच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी नगरसेवक संदिप सुरेश गायकवाड या व्यक्तीने तिच्यावर ‘लग्नाची मागणी’ स्वीकारण्यासाठी मानसिक दबाव टाकला होता, असे दिपालीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीच्या आधारावर जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिपाली पाटील ही जामखेडमधील ‘घुंगरू कला केंद्र’ येथे सुमारे दोन वर्षांपासून नृत्यकला शिकवत होती. नोकरीदरम्यान ती तिच्या दोन मैत्रिणी हर्षदा कामटे आणि चांदणी रंजन रॉय यांच्यासोबत तपनेश्वर गल्ली, जामखेड येथे राहत होती. दिपाली तिचे पती गोकुळ यांच्यापासून ती गेल्या पाच वर्षांपासून विभक्त राहत होती.
दिपालीची आई दुर्गा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संदिप सुरेश गायकवाड हा दिपालीच्या मागे लागून सतत लग्नाचा आग्रह धरत होता. “मी तुझ्याशी लग्न करणार आहे, तू होकार दे” असा दबाव टाकत तो दिपालीला त्रास देत असल्याचे तिने अनेकदा आईला फोनवर सांगितले होते.










