माजी नेत्याच्या सुनेसोबत धक्कादायक घटना! लग्नानंतर एका महिन्यातच आत्महत्या केल्याचा आरोप... नेमकं प्रकरण काय?
मुलीच्या लग्नासाठी कुटुंबियांनी 23 लाख रुपयांचा हुंडाही दिला होता. पण आता, लग्नाला जवळपास 1 महिना झाल्यानंतर कोमल उर्फ रश्मी सिंगसोबत धक्कादायक घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माजी नेत्याच्या सुनेसोबत धक्कादायक घटना!
लग्नानंतर एका महिन्यातच आत्महत्या केल्याचा आरोप...
नेमकं प्रकरण काय?
Crime News: 2 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील माजी विजयीपूर ब्लॉक प्रमुख महेंद्र प्रताप सिंग यांचा मुलगा आदित्य याने कौशांबी येथील धर्मेंद्र सिंग यांची मुलगी कोमल उर्फ रश्मी सिंगसोबत लग्नगाठ बांधली. मुलीच्या लग्नासाठी कुटुंबियांनी 23 लाख रुपयांचा हुंडाही दिला होता. पण आता, लग्नाला जवळपास 1 महिना झाल्यानंतर कोमल उर्फ रश्मी सिंगसोबत धक्कादायक घटना घडली.
पीडितेच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांच्या मुलीने आत्महत्या केली असावी किंवा तिची हत्या करण्यात आली. त्यांच्या मते, मुलीच्या सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी तिचा सतत छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर, तिच्यावर शारीरिक हिंसाचार देखील करण्यात आला होता.
लग्नाच्या एका महिन्यातच आत्महत्या केल्याचा आरोप
पीडितेच्या कुटुंबियांचा असा दावा आहे की त्यांनी लग्नाच्या वेळी सासरच्या लोकांना 23 लाख रुपये हुंडा म्हणून दिले होते. परंतु, त्यांचे सासरचे लोक इतका खर्च करून सुद्धा समाधानी नव्हते. त्यांनी मुलीला त्रास देण्यास सुरूवात केली आणि तिला वारंवार टोमणे मारण्यात आले. लग्नानंतर फक्त एक महिना आणि दोन दिवस दिवस झाल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
पीडितेच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर लगेच मुलीला चांगले स्वयंपाक न केल्याबद्दल टोमणे मारण्यात आले आणि मारहाण सुद्धा करण्यात आली. त्यांचा दावा आहे की त्यांच्या मुलीची हत्या करून तिला फाशीवर लटकवण्यात आलं असावं किंवा तिला विष तरी देण्यात आलं आहे. तिच्या सासरच्या लोकांनी तिला प्रयागराजला नेलं. तेव्हा पीडितेच्या माहेरच्या लोकांना तिच्या मुलीच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणासंदर्भात सध्या पोस्टमॉर्टम तपासणी सुरू आहे.










