मालेगाव पुन्हा हादरलं! 13 वर्षीय दिव्यांग मुलीवर व्यावसायिकाकडून लैंगिक अत्याचार, निर्जन ठिकाणी नेलं अन्...

मुंबई तक

मालेगावात एका 13 वर्षांच्या मानसिकदृष्ट्या विकलांग मुलीवर 55 वर्षीय पुरुषाने बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली.

ADVERTISEMENT

13 वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार
13 वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

13 वर्षीय दिव्यांग मुलीवर व्यावसायिकाकडून लैंगिक अत्याचार

point

मालेगावात पुन्हा घडली संतापजनक घटना

Nashik Crime: नाशिकच्या मालेगाव शहरातून पुन्हा एकदा अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे एका 13 वर्षांच्या दिव्यांग मुलीवर 55 वर्षीय पुरुषाने बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. घटनेतील नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे. 

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव दीपक धनराज छाजेड असून त्याने पीडितेला फूस लावून त्याच्या स्कूटरवर बसवलं आणि तिला आपल्यासोबत एका निर्जन ठिकाणी नेलं. तिथे त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर घृणास्पद कृत्य केलं. मुलीच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळताच पीडितेला तातडीने पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि अत्याचाराच्या गुन्ह्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: ठाणे: घटस्फोट देण्यासाठी पतीचा नकार, वैतागलेल्या पत्नीने पतीलाच संपवलं! हायवेजवळ आढळला अर्धवट जळालेला मृतदेह...

पीडितेला निर्जन ठिकाणी नेलं अन्... 

प्रकरणातील आरोपी हा एका व्यावसायिक असून पीडितेची आई त्याच्याच घरात घरकाम करत होती. त्यामुळे, आरोपीच्या घरात मुलीचं सतत येणं-जाणं असायचं. आरोपीने या परिस्थितीचा फायदा घेत अल्पवयीन पीडितेला एका निर्जन ठिकाणी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस आता या प्रकरणात अधिक तपास करत असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आता स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

हे ही वाचा: पंढरपूर : प्रसुतीवेळी चुकीच्या रक्तगटाचा पुरवठा झाल्याने महिलेचा मृत्यू, संबंधित ब्लड स्टोरेज सेंटरवर मोठी कारवाई

स्थानिकांची मागणी 

नाशिकच्या मालेगावमध्ये अशा घटनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन आणि कायदा तसेच सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक आता अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची आणि पीडितेच्या संरक्षणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. या घटनेमुळे, शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp