पंढरपूर : प्रसुतीवेळी चुकीच्या रक्तगटाचा पुरवठा झाल्याने महिलेचा मृत्यू, संबंधित ब्लड स्टोरेज सेंटरवर मोठी कारवाई

मुंबई तक

Pandharpur News : वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार, रुग्णाच्या रक्तगटाशी जुळणाऱ्या रक्तातील विसंगती तपासणे बंधनकारक असते. मात्र, ही प्रक्रिया न पाळल्याने रुग्णाचा ब्लड ग्रुप वेगळा असतानाही तिला ओ निगेटिव्ह रक्त देण्यात आले.

ADVERTISEMENT

Pandharpur News
Pandharpur News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंढरपूर : प्रसुतीवेळी चुकीच्या रक्तगटाचा पुरवठा झाल्याने महिलेचा मृत्यू

point

संबंधित ब्लड स्टोरेज सेंटरवर मोठी कारवाई

पंढरपूर : आढीव (ता. पंढरपूर) येथील एका 25 वर्षीय गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान चुकीच्या गटाचा रक्तपुरवठा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. आरती चव्हाण असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणानंतर शासनाने स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरला तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रसूतीदरम्यान रक्तपुरवठा, पण 'क्रॉस मॅच'ची गंभीर चूक

आरती चव्हाण यांना प्रसूतीसाठी मोहिते हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना रक्ताची गरज भासल्याने नातेवाईकांनी स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरमधून रक्त आणले. परंतु, रुग्णाला देण्यापूर्वी आवश्यक असलेली रक्तगट पडताळणी (क्रॉस मॅचिंग) सेंटरच्या टेक्निशियनकडून व्यवस्थित करण्यात आली नाही.

वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार, रुग्णाच्या रक्तगटाशी जुळणाऱ्या रक्तातील विसंगती तपासणे बंधनकारक असते. मात्र, ही प्रक्रिया न पाळल्याने रुग्णाचा ब्लड ग्रुप वेगळा असतानाही तिला ओ निगेटिव्ह रक्त देण्यात आले.

हेही वाचा : Mumbai Tak Chavadi: 'जर भविष्यात शिंदे साहेब उद्धव ठाकरेंसोबत गेले तरी मी शिदेंसोबतच राहणार', निलेश राणेंचं मोठं विधान

हे वाचलं का?

    follow whatsapp