Crime News: न्यूयॉर्क सिटीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सकाळी जवळपास 5 वाजताच्या सुमारास येथील एका अपार्टमेंटमध्ये अनोळखी तरुण घुसला. त्यावेळी, तिथे राहणाऱ्या एका महिलेला आरोपीने बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार सुद्धा केला. संपूर्ण घटना ही घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
महिलेला मारहाण करत बलात्कार...
न्यूयॉर्क पोस्टनुसार, रविवारी (5 ऑक्टोबर) आरोपी तरुणाने अपार्टमेंटमध्ये घुसून तिथल्या इमारतीत राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावरील हल्ल्यापासून वाचण्यासाठी पीडितेने आरोपीला पैसे देण्याचं सुद्धा आश्वासन दिलं.
संशयित आरोपीची ओळख
संबंधित प्रकरणात स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय केनेथ सिरिबो अशी संशयित आरोपीची ओळख समोर आली असून त्याने नॉरवुडमध्ये पुटनम प्लेसजवळील ईस्ट गन हिल रोडवर असलेल्या एका बिल्डिंगमध्ये हल्ला केला होता.
तक्रारदाराच्या माहितीनुसार, आरोपी तरुण इमारतीमध्ये घुसून महिलेच्या जवळ आला. त्यावेळी त्याने पीडितेला मारहाण करत तिच्यावर बलात्कार सुद्धा केला. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिच्या तोंडावर ठोसे मारले आणि तिला निर्दयीपणे जमिनीवर आपटलं असल्याचा देखील आरोप आहे.
हे ही वाचा: आधी सोशल मीडियावर ओळख अन् नंतर वृद्धाला हॉटेलमध्ये बोलवून शारीरिक संबंध... 'अशा' पद्धतीने केलं ब्लॅकमेल!
पैशांची ऑफर दिली
रिपोर्टनुसार, पीडितेने घाबरून आरोपीला विनवण्या केला आणि तिच्यावरील हल्ला थांबवण्यासाठी तिने पैशांची सुद्धा ऑफर दिली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी पीडितेची पर्स, बटवा, 250 डॉलर्स रोख पैसे तसेच तिचं ओळखपत्र आणि चाव्या सुद्धा हिसकावून घेऊन गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा हल्ल्यानंतर लगेच बिल्डिंगच्या जिन्यावरून खाली पळताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. परंतु, आरोपी इमारतीत कसा घुसला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. त्यानंतर, आरोपी सिरिबोचा शोध घेण्यात आला आणि सोमवारी (6 ऑक्टोबर) दुपारी त्याला घटनास्थळावरून जवळपास दोन किमी दूर असलेल्या एका इमारतीत ताब्यात घेण्यात आलं.
हे ही वाचा: हैद्राबाद गॅझेटिअरबाबतच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
त्यानंतर, सोमवारी संध्याकाळी या प्रकरणासंबंधी खटला चालवण्यात आला आणि आरोपी तरुणावर बलात्कार आणि चोरीसारखे मोठे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, न्यायाधीशाकडून आरोपीला 30,000 डॉलर्सच्या जामिनावर ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस सध्या, या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
