आधी सोशल मीडियावर ओळख अन् नंतर वृद्धाला हॉटेलमध्ये बोलवून शारीरिक संबंध... 'अशा' पद्धतीने केलं ब्लॅकमेल!
खरंतर, हे एक हनीट्रॅपचं प्रकरण असून आरोपी महिलांनी एका वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आधी सोशल मीडियावर ओळख अन् वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं..

हॉटेलमध्ये बोलवून शारीरिक संबंध...

'अशा' पद्धतीने केलं ब्लॅकमेल!
Crime News: गुजरातच्या जूनागढ परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. येथे सोशल मीडियावरील महिलांच्या टोळीने एका रिटायर्ड फॉरेस्ट अधिकाऱ्याला फसवून त्याच्याकडून 40 लाख रुपयांची मागणी केली. खरंतर, हे एक हनीट्रॅपचं प्रकरण असून आरोपी महिलांनी एका वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं प्रकरण काय?
नेमकं काय घडलं?
जूनागढच्या चोबारी रोडवर राहणारे एक फॉरेस्ट अधिकारी 2017 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर, काही महिन्यांपूर्वी त्यांना फेसबुकवर एका उर्मिला नावाच्या महिलेकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली. काही वेळानंतर, दोघांमध्ये बोलणं झालं आणि त्यावेळी संबंधित महिलेनं आपण अविवाहित असल्याचं सांगितलं आणि तिच्या जीवनातील खोटे दु:खद किस्से पीडित वृद्धाला रंगवून सांगितले. कालांतराने, दोघांमध्ये चांगलं नातं निर्माण झालं आणि दोघे एकमेकांसोबत व्हॉट्सअॅपवर सुद्धा चॅट करू लागले. रात्री उशीरापर्यंत दोघांमध्ये बोलणं होत गेलं.
अश्लील व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले
जवळपास पाच महिन्यांपूर्वी उर्मिलाने पीडित अधिकाऱ्याला राजकोटमध्ये बोलवलं आणि तिला त्या ऑफिसरला भेटायचं असल्याचं तिने सांगितलं. महिलेने सांगितल्याप्रमाणे, तो अधिकारी तिथे पोहोचला आणि एका हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली. दरम्यान, दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. मात्र, दोघांमधील खाजगी क्षण उर्मिलाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आणि याची पीडित वृद्धाला काहीच कल्पना नव्हती. काही काळानंतर, उर्मिलाने अधिकाऱ्याला फोन करून ती गरोदर असून तिला गर्भपात करण्यासाठी पैसे पाहिजे असल्याचं तिने सांगितलं. ती सतत त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागली. पीडित वृद्ध सुद्धा आरोपी महिलेचा विचार करून तिला गूगल पेच्या माध्यमातून पैसे पाठवत होता. मात्र, संबंधित महिलेचा हा कट असल्याची अधिकाऱ्याला कसलीच कल्पना नव्हती.
हे ही वाचा: संत्री कशी खाता? अक्षय कुमारचा फडणवीसांना प्रश्न, रोहित पवार संतापले; म्हणाले, शेतकऱ्यांच्या जखमेवर...
अनोळखी नंबरवरून फोन आला अन्...
19 सप्टेंबर 2025 मध्ये उर्मिलाने नंतर ऑफिसरला एका हॉटेलमध्ये बोलवून घेतलं. त्यावेळी सुद्धा महिलेने व्हिडीओ बनवला. काही दिवसांनंतर, अधिकाऱ्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्याच्याकडे ऑफिसरचा हॉटेलमधील व्हिडीओ असल्याचं फोन करणाऱ्याने त्याला सांगितलं. तसेच, त्याने पीडित वृद्धाकडे 40 लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. काही वेळानंतर घाबरून पीडित अधिकाऱ्याने महिलेला फोन केला आणि त्यावेळी, संबंधित महिलेनं तिलासुद्धा ब्लॅकमेल केलं जात असल्याचं सांगितलं. मात्र, काही वेळानंतर, तिचं बोलणं ऑफिसरला संशयास्पद वाटू लागलं. गर्भपात किंवा सेटलमेंटच्या नावाखाली ती वारंवार पैशांची मागणी करत होती. तेव्हा पीडित अधिकाऱ्याला संशय आला आणि त्याने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.