घरात घुसून महिलेवर थेट बलात्कार... पण, वाचण्यासाठी पीडितेने दिली चकित करणारी ऑफर! CCTV मध्ये सगळं कैद
एका अपार्टमेंटमध्ये अनोळखी तरुण घुसला. त्यावेळी, तिथे राहणाऱ्या एका महिलेला आरोपीने बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार सुद्धा केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

घरात घुसून महिलेवर थेट बलात्कार...

वाचण्यासाठी पीडितेने दिली चकित करणारी ऑफर!
Crime News: न्यूयॉर्क सिटीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सकाळी जवळपास 5 वाजताच्या सुमारास येथील एका अपार्टमेंटमध्ये अनोळखी तरुण घुसला. त्यावेळी, तिथे राहणाऱ्या एका महिलेला आरोपीने बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार सुद्धा केला. संपूर्ण घटना ही घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
महिलेला मारहाण करत बलात्कार...
न्यूयॉर्क पोस्टनुसार, रविवारी (5 ऑक्टोबर) आरोपी तरुणाने अपार्टमेंटमध्ये घुसून तिथल्या इमारतीत राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावरील हल्ल्यापासून वाचण्यासाठी पीडितेने आरोपीला पैसे देण्याचं सुद्धा आश्वासन दिलं.
संशयित आरोपीची ओळख
संबंधित प्रकरणात स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय केनेथ सिरिबो अशी संशयित आरोपीची ओळख समोर आली असून त्याने नॉरवुडमध्ये पुटनम प्लेसजवळील ईस्ट गन हिल रोडवर असलेल्या एका बिल्डिंगमध्ये हल्ला केला होता.
तक्रारदाराच्या माहितीनुसार, आरोपी तरुण इमारतीमध्ये घुसून महिलेच्या जवळ आला. त्यावेळी त्याने पीडितेला मारहाण करत तिच्यावर बलात्कार सुद्धा केला. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिच्या तोंडावर ठोसे मारले आणि तिला निर्दयीपणे जमिनीवर आपटलं असल्याचा देखील आरोप आहे.