Latur News : आरक्षणाचा मुद्दा, सरकारी नोकरी आणि आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने बनावट सुसाईड नोट लिहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन मृत व्यक्तींच्या आणि एका आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीच्या नावावर मिळालेल्या चिठ्ठ्या एका दुसऱ्याच व्यक्तीच्या हस्ताक्षरात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे तिन्ही वेगवेगळ्या समाजातील आत्महत्या प्रकरणांमध्ये मंगळवारी (दि.7) गुन्हे दाखल करण्यात आले.
ADVERTISEMENT
निलंगा तालुक्यातील दादगी येथे 13 सप्टेंबर रोजी शिवाजी वाल्मिक मेले (वय 32) यांचा करंट लागून मृत्यू झाला होता. त्यावेळी पंचनाम्यात कोणतीही चिठ्ठी सापडली नव्हती, मात्र नंतर त्यांच्या घरातून एक चिठ्ठी मिळाली, ज्यात जात प्रमाणपत्र न मिळाल्याबाबत लिहिले होते. याच प्रमाणे 14 सप्टेंबर रोजी चाकूर तालुक्यातील हणमंतवाडी तांडा येथील अनिल बळीराम राठोड (27) यांचा करंट लागून मृत्यू झाला आणि नंतर त्यांच्या नावेही अशीच चिठ्ठी पोलिसांकडे जमा करण्यात आली. दरम्यान, 26 ऑगस्टला अहमदपूर तालुक्यातील शिंदगी येथील बळीराम श्रीपती मुळे (36) यांनी विष प्राशन केले होते. त्यांच्या एका नातेवाईकाने आत्महत्येपूर्वी लिहिल्याचा दावा करत चिठ्ठी सादर केली होती. या तिन्ही चिठ्ठ्यांमध्ये आरक्षणाचा उल्लेख करण्यात आला होता.
हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यात हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
तपासात कसा लागला उलगडा?
अहमदपूर, निलंगा आणि चाकूर पोलिस ठाण्यांत नोंद झालेल्या या प्रकरणांच्या तपासात मृत व्यक्तींचे नैसर्गिक हस्ताक्षर आणि पोलिसांना सादर केलेल्या चिठ्ठ्यांवरील अक्षर जुळत नसल्याचे आढळले. त्यानंतर चाकूर पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चिठ्ठी लिहिणारी संशयित व्यक्ती ओळखली गेली. तिन्ही प्रकरणांतील संशयितांच्या हस्ताक्षरांचे नमुने घेऊन ते शासकीय दस्तऐवज परीक्षण विभागाकडे पाठविण्यात आले, जिथे अहवालात हस्ताक्षर भिन्न असल्याचे स्पष्ट झाले.
चिठ्ठ्या कोणी लिहिल्या?
जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या बळीराम मुळे यांच्या नावावरील चिठ्ठी त्यांचा चुलत भाऊ संभाजी उर्फ धनाजी भिवाजी मुळे यांनी लिहिली. मृत शिवाजी मेले यांच्या बाबतीत माथव रामराव पिटले यांनी चिठ्ठी तयार केली, तर अनिल राठोड यांच्या नावाची चिठ्ठी शिवाजी फत्तू जाधव यांनी नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड आणि तानाजी मधुकर जाधव यांच्या संगनमताने नरेंद्र जक्कलवाड यांच्याकडून लिहून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Personal Finance: घर खरेदी करताना दिवाळी ऑफर्सच्या जाळ्यात अडकू नका, बिल्डरशी गोड बोला अन्...
ADVERTISEMENT
