Crime News: उत्तर प्रदेशातीस आग्रामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणावर ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिच्या शेजारी राहणाऱ्या शुभम नावाच्या तरुणाने तिचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि त्या व्हिडीओच्या आधारे त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. पीडितेच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी दोन्ही पक्षातील लोकांना समजावून सांगितलं. मात्र, तरीसुद्धा आरोपी तरुण घाणेरडं कृत्य करत राहिला असल्याचा आरोप महिलेने केला. संबंधित पीडितेने पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. सध्या, पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
हे प्रकरण आग्रा येथील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याचं सांगितलं जात आहे. येथे राहणारी एक महिला थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर गंभीर आरोप करत तो पीडितेला ब्लॅकमेल करत असल्याचं तिने सांगितलं. आरोपी तरुणाकडे महिलेचा अश्लील व्हिडीओ असून पीडितेचा याला विरोध केला असता त्याने तिच्यासोबत छेडछाड केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसात तक्रार करताना काय म्हणाली?
पोलिसांकडे तक्रार करताना पीडितेने सांगितलं की, "काहीतरी बिघाड झाल्यामुळे माझ्या घरात पाणी आलं नव्हतं आणि त्यामुळे मी माझ्या दिराच्या घरी अंघोळीसाठी गेली. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका शुभम नावाच्या तरुणाने मी अंघोळ करत असताना व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ दाखवून त्याने मला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. मी आरोपीला विरोध केल्यानंतर त्याने माझ्यासोबत छेडछाड सुद्धा केली."
हे ही वाचा: धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी, कोण जिंकणार खटला?
पीडितेने पुन्हा पोलीस स्टेशन गाठलं अन्...
पीडित महिलेने आरोपी तरुणाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता पोलिसांनी त्या तरुणाला पोलीस ठाण्यात बोलवलं आणि दोन्ही पक्षांना समजावून सांगितलं. मात्र, त्याच्या काही दिवसांनंतर आरोपीने पुन्हा महिलेला त्रास देण्यास सुरूवात केली. त्यावेळी, पीडितेने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपी तरुण आपल्याला सतत त्रास देत असून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईची पोलिसांकडे मागणी केली.
हे ही वाचा: थेट पोलिसांनाच मारहाण, गाड्या पण फोडल्या... प्रचंड मोठा राडा, धुळ्यात असं घडलं तरी काय?
पोलिसांचा तपास
पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. त्यानंतर, आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि तरुण त्याच्या घरातून फरार असल्याचं आढळून आलं. आता पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे. या प्रकरणासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
