धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी, कोण जिंकणार खटला?
Shivsena party and Symbol Hearing : धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी, कोण जिंकणार खटला?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कोणाची?

सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी
Shivsena party and Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज (दि.8) सर्वोच्च न्यायालय अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखलं जावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात अंतरिम अर्जाद्वारे केली होती. दरम्यान, याबरोबरच मुळ याचिका देखील लवकरच निकाली काढणार असल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलं होतं. त्यामुळे आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम निकाल येणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा : Kamal Gavai: 'त्या' हल्ल्यानंतर सरन्यायाधीशांची आई शांतपणे फक्त एवढंच म्हणाल्या, 'हे वागणं म्हणजे...'
निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाला दिलं
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. बहुसंख्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार झाले. त्यामुळे शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर देखील दावा ठोकला. निवडणूक आयोगाने संख्याबळाच्या आधारावर 'शिवसेना' आणि चिन्ह 'धनुष्यबाण' चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेने मशाल या चिन्हावर लढवलेल्या पाहायला मिळाल्या.
असीम सरोदे काय म्हणाले?
दरम्यान, या सुनावणी बाबत बोलताना ठाकरेंची बाजू घेणारे वकील असीम सरोदे म्हणाले, शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण जस्टीस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर आज 16 नंबरला लागलेले असल्याने ते प्रकरण सुनावणीसाठी रिच होणार हे नक्की.. परंतु एका इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बेंचचे सुद्धा जस्टीस सूर्यकांत सदस्य न्यायाधीश आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का असे प्रश्नचिन्ह आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यातर्फे असे प्रयत्न होतीलच की सुनावणी पुढे ढकलली जावी.