थेट पोलिसांनाच मारहाण, गाड्या पण फोडल्या... प्रचंड मोठा राडा, धुळ्यात असं घडलं तरी काय?

मुंबई तक

धुळे जिल्ह्यातील अजनाळे गावात अचानक स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर हल्ला चढवत मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. ज्यामध्ये काही पोलीस जखमी देखील झाले आहेत.

ADVERTISEMENT

a shocking incident place in ajnale village of dhule where local women and men directly assaulted to police
धुळ्यात नागरिकांकडून पोलिसांना का करण्यात आली मारहाण?
social share
google news

विशाल ठाकूर, धुळे: धुळे तालुक्यातील अजनाळे गावामध्ये सोमवारी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी आक्रमक झालेल्या काही नागरिकांकडून थेट पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत कर्मचाऱ्यांना जखमी करण्यात आलं होतं. दुसरीकडे नागरिकांनी आरोप केला की पोलिसांकडून घरामध्ये घुसत संसार उपयोगी साहित्याची तोडफोड करण्यात आली. नेमकं काय घडलं अजनाळे गावामध्ये सविस्तर जाणून घेऊया.

नेमकं घडलं तरी काय?

धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अजनाळे गावामध्ये पोलीस पथकाने काही आरोपींना पकडण्यासाठी व चौकशीसाठी रविवारी सापळा लावला होता. यावेळी काही संशयास्पद तरुणांची पोलिसांकडून चौकशी केली जात होती. मात्र, याचदरम्यान काही समज-गैरसमजातून आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांना अरेरावी करत त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. त्यावेळी या स्थानिकांकडून पोलीस वाहनांची तोडफोड ही करण्यात आली. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी देखील झाले.

हे ही वाचा>> आधी सोशल मीडियावर ओळख अन् नंतर वृद्धाला हॉटेलमध्ये बोलवून शारीरिक संबंध... 'अशा' पद्धतीने केलं ब्लॅकमेल!

दरम्यान पोलिसांनी यावेळी सर्रासपणे नागरिकांच्या घरामध्ये घुसून संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केली असल्याचा आरोप करत पोलीस नेहमीच अशा प्रकारची अरेरावी या ठिकाणी करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे पोलिसांनी संशयास्पद तरुणांना शोधण्यासाठी कोंम्बिग ऑपरेशन राबवलं असल्याचं सांगत पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे नासधूस केली नसून विचारपूस करत असताना नागरिकांनी दगडफेक केली आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp