शेजाऱ्यासोबत बेडरूममध्ये शारीरिक संबंधात मश्गूल होती पत्नी, तेवढ्यात आला पती आणि...
उत्तर प्रदेशमधील बाबूरी गावात अनैतिक संबंधांची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजाऱ्यासोबत आपल्या पत्नीला आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिल्यानंतर पतीने प्रियकराची हत्या केली.
ADVERTISEMENT

सुलतानपूर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रमेश कुमार नावाचा एक पुरूष एका कार्यक्रमासाठी गावाबाहेर गेला होता. पती बाहेर गेल्याचं पाहून राकेशची पत्नी वंदना हिने तिच्या शेजारी राहणाऱ्या प्रियकर विशालला घरी बोलावलं. जेव्हा राकेश कुमार घरी परतला तेव्हा वंदना विशालसोबत नको त्या अवस्थेत अश्लील कृत्य करत होती. हे दृश्य पाहून रमेश कुमारच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो प्रचंड संतापला. रागाच्या भरात रमेशने प्रियकर विशालला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. त्याचवेळी पत्नी वंदनाला देखील गंभीर जखमी केलं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, जवळच्या लोकांनी जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. पोलिसांनी आता आरोपी पतीला अटक केली आहे आणि सध्या कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पत्नी तिच्या प्रियकरासोबत होती आक्षेपार्ह स्थितीत
ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशच्या बाबूरी गावात घडली. काल रात्री रमेश कुमार हा एका पार्टीत सहभागी होण्यासाठी गावाबाहेर गेला होता. घरी परतल्यावर त्याला त्याची पत्नी वंदना शेजारीच राहणाऱ्या विशालसोबत अश्लील चाळे करताना रंगेहात आढळली. त्यांना त्या अवस्थेत पाहून रमेश प्रचंड संतापला. पत्नी आणि तिचा प्रियकर विशाल याबाबत रमेशला काही सांगणार तोच रमेशने त्याच्या पत्नीच्या प्रियकराला काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण एवढी भयंकर होती की, ज्यामध्ये विशालचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने त्याची पत्नी वंदना हिला देखील मारहाण केली. घरातून आरडाओरडा आणि गोंधळ ऐकून जवळचे लोक हस्तक्षेप करण्यासाठी धावले त्यामुळे वंदनाचा जीव बचावला.
हे ही वाचा>> सोलापूर: MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अत्यंत हुशार साक्षीसोबत असं घडलं तरी काय? अचानक संपवलं आयुष्य
दरम्यान, ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांनाही दिली. ज्यानंतर लोकांनी वंदनाला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. तर विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
विशालच्या बहिणीने सांगितले की, रमेश तिच्या भावाला मारहाण करत होता. घरातून मोठ्याने आवाज येत होता. त्यांनी रमेशला दार उघडण्याची आणि त्यांच्या भावाला मारू नये अशी विनंती केली. पण रमेश त्यांना शिवीगाळ करत हाकलून लावलं. बहिणीने सांगितले की, रमेश तिच्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला करत होता.