सोलापूर: MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अत्यंत हुशार साक्षीसोबत असं घडलं तरी काय? अचानक संपवलं आयुष्य
सोलापुरातील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल

हुशार तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

सोलापुरातील धक्कादायक घटना
Suicide Case: सोलापुरातील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. साक्षी मैलापुरे असं मृत तरुणीचं नाव असून ती MBBS च्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होती. आपल्या राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत पीडितेने स्वत:चं आयुष्य संपवल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पीडितेच्या आईने सुरुवातीला पाहिलं
ही दुर्दैवी घटना मंगळवारी (7 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजताच्या सुमारास जुळे सोलापूरमधील आयएमएस शाळेसमोर घडली. पीडितेने घरातील सीलिंग फॅनला गळफास घेतल्याचं साक्षीच्या आईने सुरुवातीला पाहिलं. त्यानंतर, इतर कुटुंबियांच्या मदतीने साक्षीला फासावरून खाली उतरवण्यात आलं आणि तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी पीडितेची तपासणी केली असता त्यांनी साक्षीला मृत घोषित केलं.
हे ही वाचा: नाशिक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सगळं सांगितलं
पंख्याला लटकलेल्या अवस्थेत...
खरंतर, साक्षी मैलापुरे ही अभ्यासात अतिशय हुशार विद्यार्थीनी होती, असं सांगितलं जात आहे. तसेच, ती जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. पीडितेच्या आईने साक्षीला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिलं आणि तिला मोठा धक्काच बसला. त्यावेळी, कुटुंबियांच्या मदतीने साक्षीला खाली उतरवण्यात आलं आणि लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तपासणीदरम्यान, डॉक्टरांनी पीडितेला मृत घोषिक केलं.

हे ही वाचा: दीराच्या घरी महिला अंघोळीसाठी गेली अन् शेजाऱ्याने पाहिलं... नंतर, घडलं भयानक!
पोलिसांचा तपास
विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये या आत्महत्येच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आता पोलीस या घटनेमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. खरंतर, एका मेहनती आणि हुशार विद्यार्थीनीने इतक्या कमी वयात स्वत:ला का संपवलं? याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. दरम्यान, पोलीस आता सर्व बाजूंनी तपास करत असून, घटनास्थळाचा पंचनामा आणि मोबाइल तपासणीसह इतर पुरावे गोळा करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.