नाशिक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सगळं सांगितलं
Nashik Crime : नाशिक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सगळं सांगितलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आत्महत्येचं कारण सांगितलं
Nashik Crime : नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव आयुष चव्हाण असून, त्याने मृत्यूपूर्वी काही मिनिटांपूर्वी इंस्टाग्रामवर आपली शेवटची पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्याने कॉलेजच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली. त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
"माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगायला मिळालं"
ही दुर्दैवी घटना नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील एका प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सकाळी सुमारे 7 वाजून 45 मिनिटांनी आयुषने इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. त्यात त्याने लिहिले की “मित्रांनो, ही माझी शेवटची वेळ आहे. माझ्याकडे आयुष्यात कोणतंही स्वप्न किंवा ध्येय उरलेले नाही. मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे, म्हणून मी आयुष्याला अलविदा करतोय. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो, पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगायला मिळालं. ”
पोलीसांनी सांगितले की आयुष हा कॉलेजमधील हुशार विद्यार्थी होता. गेल्या काही महिन्यांपासून तो मनोमन खूप उदास दिसत होता. त्याच्या मित्रांनी सांगितले की, तो अनेकदा स्वतःला निरर्थक आणि लक्ष्यहीन असल्याचे म्हणायचा. गंगापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सची तपासणी सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, “आयुषने आत्महत्येपूर्वी स्वतःच इंस्टाग्रामवर ती पोस्ट लिहिल्याचे आम्हाला समजले आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.”