शामली (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील शामली येथील एका 38 वर्षीय कामगार सलमानने ३ ऑक्टोबर रोजी त्याच्या तब्बल 4 मुलांसह यमुना नदीत उडी मारली आणि आपलं जीवन संपवलं. सलमानचा त्याच्या चार मुलांसह एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या कृत्यासाठी त्याची पत्नी खुसनुमा आणि तिचा प्रियकर साबीर यांना जबाबदार धरत आहे. आतापर्यंत पोलिसांना फक्त सलमान आणि त्याच्या मोठ्या मुलीचे मृतदेह सापडले आहेत. इतर तीन मुलांचे मृतदेह नदीत वाहून गेल्याचे पोलिसांचे मत आहे. दरम्यान, पोलिसांनी आता सलमानची पत्नी खुसनुमा आणि तिचा प्रियकर साबीर यांना अटक केली आहे. पण सलमान हे टोकाचं पाऊल का उचललं? याचा जेव्हा पोलिसांना उलगडा झाला त्याने पोलिसांना देखील धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
सलमान वैतागलेला पत्नीच्या अनैतिक संबंधांना...
खुसनुमा तिचा प्रियकर साबीरसोबत तब्बल पाच वेळा पळून गेली होती. प्रत्येक वेळी सलमान तिला घरी परत आणायचा आणि मुलांसाठी तिच्यासोबत तडजोड करायचा. पण पुन्हा खुसनुमा तिच्या प्रियकरासोबत पळून जायची. असं करताना तिला तिच्या मुलांची देखील कोणतीही काळजी नसायची. गेल्या 7 महिन्यांपासून हा सगळा प्रकार चालू होता. खुसनुमाच्या कृत्यांमुळे सलमान खूप दुखावला गेला होता. अखेर पुन्हा एकदा खुसनुमा तिचा प्रियकर साबीरसोबत पळून गेली तेव्हा सलमानने 3 ऑक्टोबर रोजी आपल्या मुलांना सोबत घेत थेट यमुनेच्या डोहात उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.
हे ही वाचा>> शेजाऱ्यासोबत बेडरूममध्ये शारीरिक संबंधात मश्गूल होती पत्नी, तेवढ्यात आला पती आणि...
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान हा मूळचा बिहारचा रहिवासी होता. तो शामली येथे मजूर म्हणून काम करत होता, जिथे तो त्याची पत्नी आणि चार मुलांसह राहत होता. तपासात असे दिसून आले की साबीरचे सलमानची पत्नी खुसनुमासोबत प्रेमसंबंध होते, ज्यामुळे सलमान खूप अस्वस्थ झालेला. घटनेपासून दोघेही फरार होते. तथापि, कैराना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे ज्यानंतर त्यांच्याविरोधात गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही तुरुंगात पाठविण्यात आलं.
हे ही वाचा>> सोलापूर: MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अत्यंत हुशार साक्षीसोबत असं घडलं तरी काय? अचानक संपवलं आयुष्य
पती सलमानच्या मृत्यू पण पत्नी खुसनुमा कोणतंही सोयर-सुतक नाही!
पोलीस चौकशीदरम्यान खुसनुमाने तिचा पती सलमानच्या मृत्यूबद्दल कोणतेही दुःख व्यक्त केले नाही. फक्त तिने तिच्या चार निष्पाप मुलांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. चौकशीदरम्यान, खुसनुमाने साबीरसोबतच्या तिच्या नात्याला नकार देण्याचा प्रयत्न केला, परंतु पुराव्यांमुळे तिची खरा चेहरा समोर आला आहे.
ADVERTISEMENT
