Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपुरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीवर त्याने त्याच्या मुलींसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरणातील आरोपी व्यक्तीने तीन वेळा लग्न केलं असून त्याच्या दुसऱ्या पत्नीनेच पतीवर हे आरोप केले आहेत. आरोपीच्या पत्नीने पोलिसात जाऊन यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
तीन महिलांसोबत केलं लग्न...
महिलेच्या आरोपानुसार, तिच्या पतीने तीन लग्नं केली आहेत. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दुसरं लग्न केलं आणि नंतर, तिसऱ्यांना सुद्धा एका महिलेसोबत त्याने लग्न केलं. लग्नानंतर, त्यांना दोन मुली झाल्याचं दुसऱ्या पत्नीने सांगितलं. तसेच, तिसऱ्या पत्नीपासून सुद्धा त्याला मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे. वडीलच आपल्यासोबत घाणेरडं कृत्य करत असल्याचं पीडित मुलींनी त्यांच्या आईला सांगितलं.
आपल्याच मुलींसोबत घृणास्पद कृत्य
खरंतर, हे प्रकरण गोरखपुरच्या तिवारीपुर पोलीस स्टेशन हद्दीतील दाऊद चद परिसरातील असल्याची माहिती आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या दुसऱ्या पत्नीने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने तक्रारीत सांगितलं की तिचा पती आपल्याच दोन अल्पवयीन मुलींची छेड काढत असून त्यांच्यासोबत घृणास्पद कृत्य करतो.
संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीला दारूचं व्यसन असून घराची आर्थिक परिस्थिती सुद्धा बेताची आहे. आरोपी तरुण हा घरांमध्ये जाऊन वीज दुरुस्तीचं काम करतो. तो नेहमी दारू प्यायल्यानंतर घरी येऊन आपल्या मुलींसोबत घृणास्पद कृत्य करायचा.
हे ही वाचा: सोलापूर: MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अत्यंत हुशार साक्षीसोबत असं घडलं तरी काय? अचानक संपवलं आयुष्य
पतीला दारूचं व्यसन
पीडित पत्नीने याबाबत सांगितलं की पती मिळवलेले सर्व पैसे दारूसाठीच खर्च करायचा. अशातच, पत्नी पैसे कमवण्यासाठी घरातून बाहेर पडली. आरोपीची तिसरी पत्नी आपल्या माहेरी राहते. अशा परिस्थितीत, मागील वर्षभरापासून आरोपी आपल्या मुलांसोबत घृणास्पद कृत्य करायचा. इतकेच नव्हे तर, वडिलांच्या या घाणेरड्या कृत्याबद्दल कोणालाही सांगितलं तर घरातून बाहेर काढून टाकणार असल्याची धमकी सुद्धा आरोपीने मुलींना दिली.
मुलींनी आईला सगळंच सांगितलं
तक्रारीनुसार, एके दिवशी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आईकडे गेली आणि तिने आपल्या आईला वडिलांच्या घाणेरड्या कृत्यांबद्दल सांगितलं. त्यानंतर, 15 वर्षांच्या लहान मुलीने सुद्धा याबद्दल सगळंच सांगितलं. आपल्या आईला घडलेल्या घाणेरड्या प्रकाराबद्दल सांगताना दोन्ही मुली खूप रडल्या. त्यानंतर, पीडित महिला आपल्या मुलींना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलिसांना घडलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती दिली.
हे ही वाचा: न्यूड होऊन तरुणाची अश्लील कृत्ये... तरुणीने बनवला व्हिडीओ अन् आरोपीने प्रायव्हेट पार्टवरच मारली लाथ!
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेऊन त्याला लगेच अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की आरोपीला ताब्यात घेऊन त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
