न्यूड होऊन तरुणाची अश्लील कृत्ये... तरुणीने बनवला व्हिडीओ अन् आरोपीने प्रायव्हेट पार्टवरच मारली लाथ!
एका तरुणीने तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या अश्लील कृत्यांचा व्हिडीओ बनवला म्हणून आरोपींनी पीडिता आणि तिच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

न्यूड होऊन तरुणाची अश्लील कृत्ये...

तरुणीने बनवला व्हिडीओ अन्...

आरोपीने प्रायव्हेट पार्टवरच मारली लाथ!
Crime News: एका तरुणीने तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या अश्लील कृत्यांचा व्हिडीओ बनवला म्हणून आरोपींनी पीडिता आणि तिच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मारहणीदरम्यान, आरोपींनी तरुणीला जमिनीवर आपटलं आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारल्याने ती गंभीररित्या जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, यासंबंधी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना लखनऊच्या तालकटोरा पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याची माहिती आहे.
नग्नावस्थेत अश्लील कृत्ये
राजाजीपुरम येथे राहणाऱ्या पीडितेने याबाबत पोलिसांना सांगितलं की त्याच्या शेजारी राहणारे राहुल रावत आणि बाबूलाल बऱ्याच काळापासून तिच्याकडे बघून अश्लील कमेंट्स करायचे आणि तिची छेड सुद्धा काढायचे. समाजाच्या भीतीने ती त्यावेळी गप्प राहिली परंतु, आरोपींनी सर्व मर्यादाच ओलांडल्या. एके दिवशी, राहुल रावत नावाच्या तरुण पीडितेसोबत नग्नावस्थेत उभा राहिला आणि अश्लील कृत्ये करु लागला. ते दृश्य पाहून तरुणीने लगेच राहुलचा व्हिडीओ बनवला. याच कारणामुळे आरोपी संतापला आणि त्याने तरुणीचा बदला घेण्यासाठी एक कट रचला.
हे ही वाचा: मोठी बातमी: नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याची हत्या, अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह.. सिनेसृष्टी हादरली!
तरुणीची निर्दयीपणे हत्या
पीडिता घरी एकटीच असताना बाबूलाल, मोतीलाल, नीतू रावत, राहुल रावत, शिवानी रावत आणि राहुलच्या तीन आत्या तरुणीच्या घरात घुसल्या आणि तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी, घरातून आरडाओरडा ऐकून पीडितेचे वडील घरी पोहोचले मात्र, आरोपींनी त्यांना सुद्धा निर्दयीपणे मारहाण केली. दरम्यान, आरोपींनी तरुणीला जमिनीवर आपटलं आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारल्याचा आरोप पीडितेने केला.
हे ही वाचा: Govt Job: भारताच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती! किती मिळेल पगार?
पोलिसांची माहिती
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीविरोधात पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.