मोठी बातमी: नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याची हत्या, अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह.. सिनेसृष्टी हादरली!

योगेश पांडे

Jhund fame Actor priyanshu chhatri alias babu Murder : अभिनेता प्रियांशू छेत्रीची नागपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

झुंड फेम अभिनेता प्रियांशू छेत्रीची हत्या

point

नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Jhund fame Actor priyanshu chhatri alias babu Murder : नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमातील अभिनेता प्रियांशू उर्फ (बाबू) छेत्रीची हत्या करण्यात आली आहे. वायरने बांधून क्रूरपणे  प्रियांशू छेत्रीला संपवण्यात आलं आहे. ही घटना मंगळवारी (दि.8) मध्यरात्री ही घटना घडलीये. 

अधिकची माहिती अशी की, अभिनेता अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या झुंड या सिनेमा प्रियांशू छेत्री याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. रात्री त्याला वायरने बांधून क्रूरपणे संपवण्यात आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियांशू हा वायरने बांधलेल्या आणि जखमी अवस्थेत आढळून आलाय. 

पोलिसांच्या माहितीनुसार, बाबू छत्री याला तारांनी बांधून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. त्याला चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. जखमी अवस्थेत आढळल्यानंतर त्याला रुग्णालयात नेल्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयाच्या आधारे ध्रुव लालबहादुर साहू या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

अर्धनग्न अवस्थेत आढळला प्रियांशू छेत्रीचा मृतदेह 

पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा बाबू छत्री अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीराभोवती प्लास्टिकची तार गुंडाळलेली होती. या ह्त्येची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषित केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp