Govt Job: भारताच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती! किती मिळेल पगार?

मुंबई तक

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) कडून डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) आणि लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती!
इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती!

point

कसा आणि कुठे कराल अर्ज?

NIA Recruitment 2025: भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्था (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) मध्ये नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) कडून डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) आणि लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 11 सप्टेंबरपासूनच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 

राष्ट्रीय तपास संस्था ही भारत सरकारच्या गृह मंत्रालयच्या अंतर्गत काम करते. देशभरातील दहशतवाद, राष्ट्राच्या विरोधातील कारवाया आणि गंभीर गुन्ह्यांचा तपास करणं हेच या संस्थेचं काम आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवार या राष्ट्रीय तपास संस्थेत सहभागी होऊ शकतात. या भरती अंतर्गत इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये एकूण 40 रिक्त पदे भरती जाणार आहेत. 

काय आहे पात्रता? 

लोअर डीव्हिजन क्लर्क (LDC) पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. यासोबतच, केंद्र, राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशच्या संस्थेत रेग्युलक पोस्टवर कामाचा अनुभव देखील ग्राह्य धरला जाणार आहे. याशिवाय, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच स्वायत्त सरकारी संस्थांमध्ये अधिकारी म्हणून रेग्युलर बेसवर काम करणारे उमेदवार आणि ज्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञानात क्षेत्रात O किंवा A लेव्हल प्रमाणपत्र आहे, असे उमेदवार डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. 

हे ही वाचा: सासूच्या प्रेमात जावई झाला वेडा! सासऱ्याने आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडलं अन्... नंतर, घडला भयानक प्रकार

तसेच, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारासाठी 56 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp